‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 42 जणांना सुट्टी

 Ø 55 नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 22 : वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 42 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 55 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

आज (दि. 22) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 55 जणांमध्ये 34 पुरुष आणि 21 महिला आहेत. यात पांढरकवडा शहरातील दोन पुरुष, आर्णि शहरातील दोन पुरुष, वणी शहरातील एक महिला व वणी येथील दोन महिला व एक पुरुष, महागाव शहरातील तीन पुरुष, दिग्रस शहरातील तीन पुरुष व पाच महिला, दिग्रस शहरातील नागोबा मंदीर येथील एक पुरुष, पुसद शहरातील दोन महिला, पुसद शहरातील गायमुख नगर येथील दोन पुरुष, स्टेट बँक चौक येथील एक पुरुष व एक महिला, पुसद तालुक्यातील जाम बाजार येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील चार पुरुष व तीन महिला, यवतमाळ शहरातील पिंपळगाव येथील एक महिला, तलावफैल येथील एक पुरुष, सिव्हील लाईन पिस्ता शॉप येथील दोन पुरुष, अग्रवाल ले-आऊट येथील दोन महिला व एक पुरुष, वंजारी फैल येथील एक पुरुष, यवतमाळ येथील तीन पुरुष व एक महिला, नेर तालुक्यातील मोझर येथील दोन महिला व एक पुरुष, झरी शहरातील मुकुटबन येथील आरसीसीपीसी कंपनीतील चार पुरुष, मानोरा ग्रामीण पांचाळा येथील एक महिला आणि दारव्हा शहरातील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 613 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 195 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2577 झाली आहे. यापैकी 1706 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 63 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 155 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी 150 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 40852 नमुने पाठविले असून यापैकी 39994 प्राप्त तर 858 अप्राप्त आहेत. तसेच 37417 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी