जिल्ह्यात 45 पॉझेटिव्ह रुग्णांची भर ; 41 जणांना सुट्टी

 

Ø एकाचा मृत्यु

यवतमाळ, दि. 14 : जिल्ह्यात 24 तासात नव्याने 45 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले 41 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एका कारोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने आतापर्यंत मृत्युची एकूण संख्या 54 झाली आहे.

आज (दि. 14) मृत झालेली महिला (वय 75) ही पुसद शहरातील बेलोरो येथील आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 45 जणांमध्ये 31 पुरुष व 14 महिलांचा समावेश आहे. यात उमरखेड शहरातील कटकपुरा येथील एक पुरुष व शहरातील इतर ठिकाणचे तीन पुरुष, उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील एक पुरुष, पुसद शहरातील एक पुरुष, दारव्हा शहरातील तीन महिला, दारव्हा शहरातील डोल्हारी देवी परिसरातील सात पुरुष व तीन महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील दोन महिला, यवतमाळ शहरातील शासकीय वसाहत येथील एक पुरुष, शिवाजी चौक येथील एक पुरुष, वॉर्ड क्रमांक 1 येथील एक महिला, सुवर्णा नगरी येथील एक पुरुष तसेच शहरातील दोन पुरुष व एक महिला, यवतमाळ तालुक्यातील शेकलगाव येथील एक महिला, बाभुळगाव तालुक्यातील डेहणी येथील एक पुरुष, नेर शहरातील मारवाडी चौक येथील एक महिला, शहरातील कानपूर येथील एक महिला, आर्णि शहरातील शास्त्री नगर येथील तीन पुरुष, महाकाली चौक येथील दोन पुरुष, मोमीनपुरा येथील दोन पुरुष, भीमनगर येथील एक पुरुष, जुनी वस्ती वॉर्ड क्रमांक 9 येथील एक पुरुष व मुबारकपुरा येथील एक पुरुष तसेच घाटंजी शहरातील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु आणि 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 41 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 634 आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2078 झाली आहे. यापैकी 1388 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 54 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 148 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 33589 नमुने पाठविले आहे. यापैकी 33078 प्राप्त तर 511 अप्राप्त आहेत. तसेच 31000 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी