जिल्ह्यात 104 नवीन कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांची भर

 


Ø दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु ; 175 जणांना सुट्टी

यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यात आज (दि. 17) नव्याने 104 कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली तर  दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृत झालेल्यामध्ये दारव्हा येथील आठवडी बाजार परिसरातील 55 वर्षीय पुरुष आणि पुसद येथील खतीब वॉर्डातील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच 24 तासात 175 जणांना सुट्टी देण्यात आली आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्या 104 जणांमध्ये 54 पुरुष आणि 50 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील सेवानगर येथील एक पुरूष दोन महिला, शर्मा लेआऊट येथील एक पुरूष व दोन महिला, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील एक महिला, शारदा चौक येथील एक पुरूष, शिवनेरी सोसायटी येथील दोन महिला, शहराच्या इतर भागातील 27 पुरूष व 25 महिला, दिग्रस शहरातील 14 पुरूष व 13 महिला, गवळीपुरा दिग्रस येथील एक महिला, पुसद शहरातील तीन पुरूष, मोती नगर येथील एक पुरूष, पुसद तालुक्यातील बेलोरा येथील एक पुरूष, कळंब येथील चार पुरूष व चार महिला, उमरखेड येथील एक पुरूष यांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 573 असून होम आयसोलेशनमध्ये 131 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2342 झाली आहे. यापैकी 1578 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 60 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 140 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 37323 नमुने पाठविले असून यापैकी 36844 प्राप्त तर 479 अप्राप्त आहेत. तसेच 34502 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी