किशोर तिवारी यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

 



यवतमाळ, दि. 27 : वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने आरोग्य, कृषी, शिक्षण यांचा प्रामुख्याने समावेश होता.

बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. बाबा येलके, डॉ. विजय डोंबळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.

यावेळी किशोर तिवारी म्हणाले, नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती कमी करण्यासाठी अधिका-यांनी जनजागृती करावी. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणतीही सुचना न देता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दौरा करावा. असुविधा दिसल्या तर संबंधितांवर कारवाई करावी. शेतमालावर बोंडअळीचे आगमन झाले आहे.  किटकनाशक फवारणीमुळे शेतकरी / शेतमजुर बाधित होऊ देऊ नका. विषबाधेचा एकही मृत्यु होता कामा नये. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास वाढावा, यासाठी प्रयत्न करा, अशा सुचना त्यांनी केल्या.

बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००००००००


Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल