जिल्हाधिकाऱ्यांचा कोविड वार्डातील रुग्णांशी संवाद

 


यवतमाळ,दि. 10 :  जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक कोरोनाबाधीत रुग्णाला कोरोनामुक्त करणे यालाच जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे प्रत्यक्ष कोविड वार्डात जाऊन रुग्णांसोबत संवाद साधत आहेत. नुकतीच त्यांनी कोविड वार्डात भेट दिली होती व आज (दि.10) पुन्हा त्यांनी कोविड वार्डातील पॉझेटिव्ह रुगणांसोबत संवाद साधला. याप्रसंगी त्यांचेसोबत जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे उपस्थित होते.  जिल्हाधिकारी सिंह यांनी डॉ. पांचाळ यांना पीपीई किट घालण्यास देखील मदत केली.

            यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी प्रत्येक रुग्णाची आस्थेवाईकपणे विचारणा केली. उपचार व्यवस्थीत होतो काय, डॉक्टरांच्या व्हिजीट किती वेळा होतात,  जेवण, पाणी आदि व्यवस्था कशी आहे, याबाबत त्यांनी रुग्णांकडून माहिती जाणून घेतली.

            प्रत्येक आठवड्यात जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस करणार आहे. काही दिवसातच जिल्हाधिकाऱ्यांची ही आयासोलेशन वार्डात दुसरी भेट आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेला प्रत्येकच रुग्ण अतिशय महत्वाचा असून त्यांना योग्य उपचाराअंती घरी सुखरूप घरी सोडण्यात आनंद असल्याचे त्यांनी सांगीतले.

०००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी