Posts

Showing posts from September, 2017

विषबाधित शेतकरी, शेतमजूरांना आर्थिक मदत द्या - गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

Image
यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात किटकनाशकाच्या फवारणीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजूर बाधित झाले आहेत. हा अतिशय गंभीर विषय आहे. यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तसेच शासकीय यंत्रणेकडून विषबाधित शेतकरी आणि शेतमजुरांना आर्थिक मदत देण्याचे प्रयोजन करून तसा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, अशा सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केल्या. येथील विश्रामगृहात जलयुक्त शिवार, कृषी विभाग, सिंचनाची स्थिती, कायदा आणि सुव्यवस्था आदी विषयांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार, आमदार राजू तोडसाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, अधिक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते. विषबाधीत शेतकरी आणि शेतमजूरांचा गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत समावेश करता येईल का, अशी विचारणा करून गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, शेतक-यांसोबतच बाधित शेतमजूरांनासुध्दा आर्थिक मदत मिळाली पाहिजे. फवारणी करतांना विषबाधा होऊ नये म्हणून कृ

यवतमाळ उद्योग नगरी म्हणून उदयास येईल - पालकमंत्री मदन येरावार

Image
यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभुत सुविधांची कामे सुरू आहे. दोन-दोन राष्ट्रीय महामार्गासोबत जिल्ह्याला लागून जाणा-या समृध्दी मार्गामुळे रस्त्यांचे जाळे विस्तारत आहे. रस्त्यांचा हा हब असून येथे विकसीत होणा-या टेक्सटाईल पार्कमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार येतील. त्यामुळे भविष्यात यवतमाळ ही उद्योग नगरी म्हणून उदयास येईल, असा विश्वास पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला. यवतमाळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे औद्योगिक क्षेत्रात आयोजित टेक्सटाईल पार्कच्या जलवाहिनी व इतर पायाभूत सुविधांच्या भुमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अमरावती औद्यागिक विकास विभागाचे कार्यकारी अभियंता जे.व्ही. कांगणे, एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक डी.डी.पारधी, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष नंदलाल सुराणा, रेमंड युको डेनीमचे व्यवस्थापक नितीन श्रीवास्तव, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक दयाल चव्हाण, उपअभियंता हेमंत कुलकर्णी उपस्थित होते. जिल्ह्यात टेक्साटाईल पार्कसाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा केल्याचे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, जिल्ह्याच्या व

फवारणीबाधीत शेतक-यांना तात्काळ वैद्यकीय सेवा द्या - पालकमंत्री मदन येरावार

Image
Ø जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात किटकनाशकांच्या फवारणीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधीत झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना स्थानिक पातळीवर वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बागडे, जिल्हा आरोग्य्‍ अधिकारी डॉ. डी.जी.चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.जी.धोटे, उपविभागीय कृषी अधिकारी वानखेडे, कृषी विस्तार अधिकारी कळसाईत आदी उपस्थित होते. शेतक-यांना फवारणीमुळे विषबाधा होऊ नये, यासाठी कृषी विभागाने गांभीर्याने प्रयत्न करावे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, कृषी विभागाच्या अधिका-यांनी किटकनाशक फवारणीसंदर्भात गावागावात जाऊन शेतक-यांच

एकही बालक व गरोदर माता लसीकरणापासून वंचित राहू नये - जिल्हाधिकारी डॉ. देशमुख

Image
यवतमाळ, दि. 27 : आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यात “ इंद्रधनुष्य ” ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीकरणापासून वंचित असलेली शुन्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर माता यांच्यासाठी ही विशेष मोहीम आहे. त्यामुळे या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील एकही बालक व गरोदर माता लसीकरणापासून वंचित राहू नये, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात “ मिशन इंद्रधनुष्य ” संदर्भात आयोजित जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे समन्वयक डॉ. एस.आर. ठोसर, इंडियन मेडीकल असोसिएशन यवतमाळ शाखेचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील मानकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. संजीव जोशी, डॉ. पी. एस. चव्हाण, डॉ. मनोज तगडपल्लीवार, डॉ. एस.एस. ढोले उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, मिशन इंद्रधनुष्य गांभिर्याने राबविणे गरजेचे आहे. यात सहभागी होणा-या इतरही विभागांनी आपापल्या जबाबदा-या काळजीपूर्वक पार पाडाव्यात. तसेच कोणत्या विभागाचे कोणते काम आहे, त्याचा नियमित फॉलो-अप आरोग्य विभागाने घ्यावा. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात दैनंदिन वै

वृक्ष लागवड मोहिमेसाठी आतापासून नियोजन करा - जिल्हाधिकारी डॉ. देशमुख

Image
यवतमाळ, दि. 25 :   पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली वृक्ष लागवड मोहीम ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. देशातील इतरही राज्ये महाराष्ट्राच्या या योजनेचे अनुकरण करीत आहे. पुढील वर्षी म्हणजे 2018 साली संपूर्ण राज्यात 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या अंतर्गत आपल्या जिल्ह्यात 59 लक्ष वृक्ष लागवड करायची आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणांनी या मोहिमेला यशस्वी करण्याकरीता आतापासून नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवड मोहिमेच्या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, मुख्य वनसंरक्षक जी.टी.चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, यवतमाळचे उपवनसंरक्षक बी.एन.पिंगळे, पुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे उपस्थित होते. केवळ शासकीय उद्दिष्टासाठी वृक्ष लागवड मोहिमेकडे बघू नका, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, गत दोन वर्षांपासून राज्य शासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. 2016 मध्ये 2 कोटी, 2017 मध्ये 4 कोटी आणि आता 2018 मध्ये 13 कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात

पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

Image
यवतमाळ, दि. 25 :   पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महाजन, सुचना व विज्ञान केंद्राचे राजेश देवते, जिल्हा नियोजन अधिकारी राठोड उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी प्रखर राष्ट्रवादाने प्रेरीत होऊन लोककल्याणाची व्याख्या केली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचला पाहिजे, हेच त्यांचे ध्येय होते. त्यांनी सांगितलेल्या अंत्योदयाच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना शासनाच्या वतीने अनेक योजनांचा लाभ देण्यात येतो, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार डी.एम. राठोड यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. कार्यक्रमाला उपस्थित इतर अधिकारी आणि कर्मचा-यांनीसुध्दा त्यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केले.                            

कुमारी मातांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता ठेवा - जिल्हाधिकारी डॉ. देशमुख

Image
यवतमाळ , दि. 20 : कुमारी माता ह्या कुटुंबाचाच एक भाग आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्व विभाग आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन काम केले तर चांगल्या उपाययोजना होऊ शकतात. त्यामुळे कुमारी मातांच्या प्रश्नांकडे गांभिर्याने बघून त्यांच्याबाबत संवेदनशीलता ठेवा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी  केले.             जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बालविकास विभागातर्फे “ कुमारी मातांची सद्यस्थिती व उपाययोजना ” या विषयावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले,जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकरी ठमके, झरी-जामणी पंचायत समितीच्या सभापती लता आत्राम, महिला व बालविकास अधिकारी व्ही. एस. पवार उपस्थित होते.             कुमारी मातांच्या प्रश्नांवर उपाययोजना सुचविण्यासाठी मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आज ही बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, या प्रश्नांवर नागरिकांनी सुचविलेल्या सुचना अतिशय महत्वाच्या आहेत. या प्रश्नासंदर्भात शा

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल - महसूल राज्यमंत्री संजय राठोड

Image
जागेवरच निर्णय आणि तक्रारींचा निपटारा यवतमाळ, दि. 17 :   लोकप्रतिनिधी या नात्याने व शासनाचा प्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवून त्यांना समाधान देणे, यासाठी मी सदैव प्रयत्नशिल आहे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी येथे केले. स्थानिक शहीद जिड्डेवार भवन येथे सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित तालुकास्तरीय समाधान शिबिरात ते बोलत होते.   यावेळी आ. राजू तोडसाम, जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजनकीवार, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, पंचायत समिती सभापती इंदू मिसेवार, उपसभापती संतोष बोडेवार, सदस्य अनुराधा वेट्टी, नगर परिषद उपाध्यक्ष सुनंदा देशमुख, सदस्य प्रा. मंगेश होटे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना.संजय राठोड म्हणाले, महसूल विभाग हा शासन, प्रशासनाचा कणा आहे. या विभागाशी शेतकरी, विद्यार्थी, सर्वसामान्य जनतेचा दररोज थेट संबंध येतो. प्रशासन गतिमान होऊन जनतेच्या तक्रारी निकाली निघाव्या आणि त्यांचा वेळ, श्रम, पैशाची बचत व्हावी यासाठी आपण महसूल विभागांतर्गत समाधान शिबीर सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात उपविभागीय स्तरावर हे शिबीर घेण्या

ग्रामीण भागाच्या प्रगतीनेच देश सशक्त होईल - पालकमंत्री मदन येरावार

Image
यवतमाळ , दि. 17 : “ खेड्यांकडे चला ” हा संदेश आपल्याला महात्मा गांधी यांनी दिला होता. खरा भारत हा ग्रामीण भागात आहे, असे त्यांचे म्हणणे होते. आपण सर्व रोजगारक्षम आहोत. या क्षमेतेचा उपयोग करून आपले कुटुंब गतिमान करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेतला तर आपले उत्पन्न वाढेल. त्यातून जीवनमान उंचावेल. कुटुंबासोबतच गावाची, राज्याची आणि देशाची प्रगती होईल. त्यामुळे सशक्त आणि विकसनशील होण्यासाठी ग्रामीण भागाची प्रगती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. लोहारा केंद्रातंर्गत येणा-या भोयर येथे व्यावसायिक व सक्षमीकरण प्रबोधन तसेच ग्रामरक्षक दल युवकांसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर गावच्या सरपंचा यशोदा लुंगसे, ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार डहाके, सहाय्यक वनसंरक्षक गिरीजा देसाई उपस्थित होत्या. गावात ग्रामरक्षक दलाची स्थापना, महिला बचत गटांना मार्गदर्शन, महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतल्याबद्दल गावक-यांचे अभिनंदन करून पालकमंत्री येरावार म्हणाले, महिला सक्षमीकरणाची ज्योत क्रांतीज्योती सा

फुटबॉलच्या प्रोत्साहनासाठी आमदार चषक सुरू करणार - पालकमंत्री मदन येरावार

Image
जिल्ह्यात “ मिशन फुटबॉल 1 मिलीयन ” कार्यक्रमाचे उद्घाटन यवतमाळ, दि. 15 : फुटबॉलचा 17 वर्षाखालील विश्वचषक यावेळेस प्रथमच भारतात होत आहे. त्यामुळे देशात फुटबॉल फिवर आहे. यवतमाळच्या फुटबॉलचा इतिहाससुध्दा गौरवशाली आहे. वर्षानुवर्षे फ्रेन्डस क्लबच्या माध्यमातून यवतमाळकरांनी तो अनुभवला आहे. या खेळाला जिल्ह्यात आणखी  प्रोत्साहन मिळावे, यासाठी आमदार चषक सुरु करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री मदन येरावार यांनी केली. महाराष्ट्र फुटबॉल मिशन -1 मिलीयन अंतर्गत येथील जवाहरलाल नेहरू जिल्हा क्रीडा संकूलावर आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, दादाजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ. उल्हास नंदूरकर, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये उपस्थित होते. पालकमंत्री येरावार म्हणाले, जगात लोकप्रिय असलेल्या या खेळाचा ज्वर आपल्या देशात आणि राज्यात दिसून येत आहे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) च्या माध्यमातून हा विश्वचषक भारतात होत आहे. आपल्या राज्यात मुंबईच्या डी.वा

अत्याधुनिक सभागृहातून जिल्ह्याच्या विकासाची दिशा ठरावी - पालकमंत्री मदन येरावार

Image
प्रशासकीय इमारतीमध्ये नियोजन समितीच्या सभागृहाचे उद्घाटन यवतमाळ, दि. 15 : जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे. या समितीची निवडणूक नुकतीच सर्वानुमते पार पडली. जिल्ह्याच्या विकासासंदर्भात शासन, निवडून आलेले नवीन लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचे प्रशासन या अत्याधुनिक सभागृहात निर्णय घेणार आहेत. 27 लक्ष 72 हजार लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाची दिशा या सभागृहात ठरावी, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या प्रशासकीय इमारतीतील नियोजन समितीच्या सभागृहाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महसूल राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अ

देशाच्या प्रगतीसाठी स्वच्छता आवश्यक - पालकमंत्री मदन येरावार

Image
“ स्वच्छता ही सेवा ” अभियानाचा जिल्ह्यात लासिना येथून शुभारंभ यवतमाळ, दि. 15 : संपूर्ण जग भारताकडे भविष्यातील महासत्ता म्हणून बघत आहे. अनेकांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर होण्यासाठी शासन आणि लोकसहभागातून प्रयत्न केले जात आहे. सामाजिक, आर्थिक प्रगती करतांना निरोगी व सुदृढ राहणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वच्छतेची गरज आहे. कारण स्वच्छतेशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. यवतमाळ तालुक्यातील लासिना ग्रामपंचयतीमध्ये जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता सहाय्य्‍ विभागाच्या वतीने आयोजित “ स्वच्छता ही सेवा ” अभियानाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त मुख्याधिकारी शरद कुलकर्णी, यवतमाळचे तहसीलदार सचिन शेजाळ, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, सभापती नंदिणी दरणे, लासिनाच्या सरपंचा अलका कांबळे, उपसरपंच कनैय्या राठोड उपस्थित होते. देशाच्या वि

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री मदन येरावार

Image
Ø अमृत योजनेंतर्गत पाण्याची टाकी आणि पाईप लाईनचे भुमिपूजन यवतमाळ, दि. 14 : केंद्र आणि राज्यात विकास करणारे सरकार आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, घर, विद्युत आदी नागरिकांच्या मुलभूत सुविधा आहेत. या सुविधा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यवतमाळमध्येही मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु असून यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. भोसा येथे 9.5 लक्ष लीटर क्षमता असलेली पाण्याची टाकी आणि 35 किमी लांबीच्या पाईप लाईनच्या भुमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे तर मंचावर जि.प. समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, नगरसेवक प्रवीण प्रजापती, माया शेरे, रिता घावतोडे, संगिता कासार, विजय खडसे, पुष्पा ब्राम्हणकर, जीवन प्राधिकरणचे बेले, बोरकर उपस्थित होते. जनतेच्या पैशातूनच हा विकास होत आहे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, शहर आणि लगतच्या ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी चापडोह धरण मंजूर करून घेतले. 69 कोटी रुपयांची ही पहिली योजना आहे. शहरासोबतच लगतच्या ग्रामपंचायतीतील नागरिकांनासुध

राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे भुसंपादन संदर्भात अडचणी दूर करा - पालकमंत्री मदन येरावार

Image
यवतमाळ, दि. 13 : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प हे राज्य शासनाच्या वॉररुम मधील विषय आहेत. या दोन्ही संदर्भात जमिनीचे भुसंपादन आणि नागरिकांना मिळणारा मोबदला याबाबत काही अडचणी असल्यास त्या त्वरीत दूर करा, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे भुसंपादनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) चंद्रकांत जाजू, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, अपार, नितीनकुमार हिंगोले, कापडनीस उपस्थित होते. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग सुरवातीला 625 कोटी रुपयांचा होता. वर्षानुवर्षे रखडलेल्या या प्रकल्पाची किंमत आता 2500 कोटींवर गेली आहे. मात्र राज्यात नवीन सरकार आल्यानंतर राज्य सरकारने आपल्या हिश्याची 40 टक्के रक्कम म्हणजे 1 हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी त्वरीत उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे जात आहे. यवतमाळच्या विकासासाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यामुळे अडलेल्या

कृषी सोबत सर्वच विषय प्राधान्याने हाताळणार

Image
डॉ. राजेश देशमुख यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार यवतमाळ, दि. 11 : सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. शेतकरी आणि कृषी हा विषय सर्वोच्च स्थानी असला तरी जिल्ह्यातील सर्व विषयाला आपले प्राधान्य राहील, असे जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. जिल्हाधिकारी  कार्यालयात आज (दि.11) डॉ. देशमुख यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते. प्रशासनातील सर्व विभागाचा समन्वय ठेवून महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि संवेदनशील करणे, हा मुख्य हेतू आहे. जिल्ह्यातील सर्वच विषय महत्वाचे आहेत. लोकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी. भराडी, राष्ट्रीय सुचना व माहिती केंद्राचे (एनआयसी) राजेश देवते, उपजिल्हाधिकारी महाजन आदी उपस्थित होते. सातारा येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून डॉ. र

दारव्हा येथील पाणी पुरवठा योजनेची कामे त्वरीत करा - महसूल राज्यमंत्री राठोड

Image
Ø जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला विविध विभागाचा आढावा यवतमाळ, दि. 8 : यावर्षी पाणी टंचाईची समस्या गंभीर आहे. संपूर्ण जिल्ह्यातच पावसाचे प्रमाण कमी असून दारव्हा येथे तर सर्वात कमी पाऊस पडला आहे. पाणी पुरवठा योजनेवर दारव्ह्याचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे दारव्हा येथील पाणी पुरवठा योजनेची कामे त्वरीत करा, अशा सुचना महसलू राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, दारव्हाचे उपविभागीय अधिकारी संजय देशपांडे, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोहाड, दारव्हाचे नगराध्यक्ष बबनराव हिरवे उपस्थित होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संबधित कंत्राटदार कंपनीने पाणी पुरवठा योजना त्वरीत पूर्ण होण्यासाठी कामाची गती वाढवावी. जॅकवेल, फिल्टर प्लॅन आणि टाक्याचे काम येत्या दोन-तीन महिन्यात पूर्ण करावे. ही कामे पुर्ण होताच पाईप उपलब्ध करून देण्यात येईल, असे राज्यमंत्री राठोड यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दिग्रज येथील रोजगार हमी योजनेच्या कामाची प्रगती, वडगाव संग्राहक तलावाच्या

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील पदे रिक्त राहणार नाही - पालकमंत्री मदन येरावार

Image
बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण यवतमाळ , दि. 3 : नागरिकांच्या दृष्टिने सक्षम आरोग्य यंत्रणा महत्वाची असते. यवतमाळ जिल्ह्यात वैद्यकीय अधिका-यांच्या रिक्त जागा भरण्याचे अधिकार प्रथमच जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे. त्यानुसार वैद्यकीय अधिका-यांच्या स्थानिक पातळीवर मुलाखती घेणे सुरु आहे. या मुलाखतीसाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील डॉक्टर्स येत आहेत. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील एकही पद रिक्त राहणार नाही, याकडे आपण विशेष लक्ष देऊ, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. बांधकाम व अर्थ सभापती निमिष मानकर, शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, पंचायत समितीचे सभापती एकनाथ तुमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. जी. चव्हाण, बेलोराच्या सरपंच कल्पना नेवारे उपस्थित होत्या. बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत