दारव्हा येथील पाणी पुरवठा योजनेची कामे त्वरीत करा - महसूल राज्यमंत्री राठोड

Ø जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला विविध विभागाचा आढावा


यवतमाळ, दि. 8 : यावर्षी पाणी टंचाईची समस्या गंभीर आहे. संपूर्ण जिल्ह्यातच पावसाचे प्रमाण कमी असून दारव्हा येथे तर सर्वात कमी पाऊस पडला आहे. पाणी पुरवठा योजनेवर दारव्ह्याचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे दारव्हा येथील पाणी पुरवठा योजनेची कामे त्वरीत करा, अशा सुचना महसलू राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, दारव्हाचे उपविभागीय अधिकारी संजय देशपांडे, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोहाड, दारव्हाचे नगराध्यक्ष बबनराव हिरवे उपस्थित होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संबधित कंत्राटदार कंपनीने पाणी पुरवठा योजना त्वरीत पूर्ण होण्यासाठी कामाची गती वाढवावी. जॅकवेल, फिल्टर प्लॅन आणि टाक्याचे काम येत्या दोन-तीन महिन्यात पूर्ण करावे. ही कामे पुर्ण होताच पाईप उपलब्ध करून देण्यात येईल, असे राज्यमंत्री राठोड यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दिग्रज येथील रोजगार हमी योजनेच्या कामाची प्रगती, वडगाव संग्राहक तलावाच्या लाभक्षेत्रातील शिरसगाव, पांढरी, खळणा येथील शेतक-यांनी केलेली मागणी, दिग्रज-दारव्हा-नेर येथील नदी पुर्नजीवन आढावा, कोहळ प्रकल्पबाधीत पुर्नवसीत गावांमध्ये नागरी सुविधा उपलब्धतेबाबत माहिती घेतली.
बैठकीला विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.   
                                                  0000000000   

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी