पालकमंत्री यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भुमिपूजन आणि लोकार्पण

यवतमाळ, दि. 2 : जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते आज (दि.2) यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचे भुमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले.
यात जांब येथे 25 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणा-या वडगाव-जाबं-नाकापार्डी  या 1300 मीटर रस्त्याचे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रेणु शिंदे, जांबचे उपसरपंच पुरुषोत्तम टिचुकले पोलिस पाटील संजय घोडाम आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. येथील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नरेगा मधून विहिरी द्याव्या व पाण्याची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सुचना पाणी पुरवठा विभागाला दिल्या.
तसेच जवळा (इजारा) येथील लोणी-जवळा-सालोड-बारड येथे पहिल्या टप्प्यात 38  लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या 2.2 किमी सिमेंट रस्त्याचे लोकार्पण केले. तर दुस-या टप्प्यात 25 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणा-या लोणी-जवळा-सालोड येथील रस्त्याचे भुमिपूजन केले. खरद येथे 48 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या 5 किमी रस्त्याचे लोकार्पण पालकमंत्र्यांनी केले. या निधीअंतर्गत खदर परिसरात 5 किमी चा रस्ता, 3 छोटे पूल आणि 2 किमीच्या रस्त्याचे खडीकरण करण्यात आल्याचे पालकमंत्री येरावार यांनी सांगितले.
रस्त्याच्या कामांची गती वाढविणे गरजेचे आहे. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, वृध्दापकाळ, राजीव गांधी जीवनदायी, पंतप्रधान आवास आदी योजनांची माहिती पटवारी, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवकांनी गावक-यांना दिली पाहिजे. गावातील एकही नागरिक योजनांपासून वंचित राहाता कामा नये, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी खरदच्या सरपंचा नुतन काटे, पोलिस पाटील प्रमोद काटे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. यावेळी मी मुख्यमंत्री बोलतोय या माहिती पुस्तिकेचे वाटप गावक-यांना करण्यात आले.


                                                         00000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी