पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

यवतमाळ, दि. 25 : पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महाजन, सुचना व विज्ञान केंद्राचे राजेश देवते, जिल्हा नियोजन अधिकारी राठोड उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी प्रखर राष्ट्रवादाने प्रेरीत होऊन लोककल्याणाची व्याख्या केली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचला पाहिजे, हेच त्यांचे ध्येय होते. त्यांनी सांगितलेल्या अंत्योदयाच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना शासनाच्या वतीने अनेक योजनांचा लाभ देण्यात येतो, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार डी.एम. राठोड यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडला.
कार्यक्रमाला उपस्थित इतर अधिकारी आणि कर्मचा-यांनीसुध्दा त्यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केले.
                                                             00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी