फवारणीबाधीत शेतक-यांना तात्काळ वैद्यकीय सेवा द्या - पालकमंत्री मदन येरावार

Ø जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक
यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात किटकनाशकांच्या फवारणीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधीत झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना स्थानिक पातळीवर वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बागडे, जिल्हा आरोग्य्‍ अधिकारी डॉ. डी.जी.चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.जी.धोटे, उपविभागीय कृषी अधिकारी वानखेडे, कृषी विस्तार अधिकारी कळसाईत आदी उपस्थित होते.
शेतक-यांना फवारणीमुळे विषबाधा होऊ नये, यासाठी कृषी विभागाने गांभीर्याने प्रयत्न करावे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, कृषी विभागाच्या अधिका-यांनी किटकनाशक फवारणीसंदर्भात गावागावात जाऊन शेतक-यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी. फवारणीबाधीत शेतक-यांना स्थानिक ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टर, कर्मचारी यांनी मुख्यालयी थांबून रुग्णालयातील औषधीसाठा, स्वच्छता आदी बाबी अद्ययावत ठेवाव्या. तसेच फवारणी करतांना विषबाधा होऊ नये यासाठी शेतक-यांनी काळजी घेऊन तोंडावर मास्क्, हातमोजे आदी घालणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले, शेतक-यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी शासकीय यंत्रणेसह सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी भजन,कीर्तनाच्या माध्यमातून शेतक-यांमध्ये जनजागृती करावी. वैद्यकीय सेवेबाबत 108 ची सुविधा नेहमी तत्पर ठेवावी, असे ते म्हणाले. यावेळी शेतक-यांचे कर्जमाफी अर्ज, त्याची पडताळणी आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, आत्माचे संचालक काळे, अग्रणी बँक व्यवस्थापक कुमरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी