गेल्या 24 तासात 9 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह
Ø जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2408 बेड उपलब्ध यवतमाळ, दि. 29 जून : गेल्या 24 तासात जिल्ह्यात केवळ एक जण पॉझेटिव्ह तर 9 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 415 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 414 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 43 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72718 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70889 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे. आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये झरीजामणी येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 79 हजार 704 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 06 हजार 936 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.70 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.24 आहे तर मृत्युदर 2.46 आहे. जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2408 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड