24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे जास्त

 


*जिल्हयात 66 कोरोनामुक्त, 24 पॉझेटिव्ह,

* जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 2159 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 11 जून : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण दुप्पटीपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात 24 जण पॉझेटिव्ह तर 66  जण कोरोनामुक्त झाले असून विशेष म्हणजे आज कुणाचाही मृत्यू झाला नाही.     

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी  एकूण 2130 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी  24 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2106 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 580 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती  161 तर गृह विलगीकरणात 419 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72528 झाली आहे. 24 तासात 66 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 70165 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1783 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 61 हजार 310 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 88 हजार 452 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.97 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी  दर 1.13  आहे  तर मृत्युदर 2.46 आहे.            

पॉझेटिव्ह आलेल्या 24 जणांमध्ये 16 पुरुष आणि 8 महिला आहेत. यात आर्णी येथील 1,  दारव्हा येथील 3, दिग्रस येथील 2 , घाटंजी  येथील 3 , नेर 2,  पांढरकवडा 1,  वणी येथील 5, यवतमाळ येथील  5, तर झरीजामणी येथील 2  रूग्णंचा समावेश आहे.  

            जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2159 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 120 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2159 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 54 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 523 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 44 रुग्णांसाठी उपयोगात तर  482 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 22 उपयोगात तर 1154 बेड शिल्लक आहेत.

000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी