24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे जास्त


* जिल्हयात 75 कोरोनामुक्त, 30 पॉझेटिव्ह, दोन मृत्यू

* जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 2131 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 10 : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण दुप्पटीपेक्षा जास्ता आहे. जिल्ह्यात 30 जण पॉझेटिव्ह तर 75 जण कोरोनामुक्त झाले असून आज दोन व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील एक तर खाजगी रूग्णालयातील एका रूग्णाचा समावेश आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरूवारी   एकूण 2895 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी  30 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2865 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 622 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती  192 तर गृह विलगीकरणात 430 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72504 झाली आहे. 24 तासात 75 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 70099 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1783 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 59 हजार 283 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 86 हजार 449 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.04  आहे  तर मृत्युदर 2.46 आहे.            

आज मृत्यू झालेल्या रूग्णांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ असलेल्या दारव्हा शहरातील 80 वर्षीय पुरूष   तर खाजगी रूणालयात यवतमाळ  येथील 66 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे. 

पॉझेटिव्ह आलेल्या 30 जणांमध्ये 20 पुरुष आणि 10 महिला आहेत. यात दारव्हा येथील 7, दिग्रस येथील 1, घाटंजी येथील 1,कळंब 2,  महागाव येथील 1, नेर 1, पुसद येथील 7, उमरखेड येथील 2,  वणी येथील 3, यवतमाळ येथील  2, झरीजामणी येथील 1  रुग्ण तर इतर शहरातील 2 रूग्णंचा समावेश आहे.  

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2131 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 148 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2131 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 61 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 516 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 51 रुग्णांसाठी उपयोगात तर 475 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 36 उपयोगात तर 1140 बेड शिल्लक आहेत.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी