24 तासात कोरोनाबधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त

 


* जिल्हयात 68 कोरोनामुक्त, 33 पॉझेटिव्ह

* जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 2070 बेड उपलब्ध 

यवतमाळ, दि. 8 जून : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या आजही  जास्त आहे. आज 68 जण कोरोनामुक्त झाले असून 33 जण पॉझेटिव्ह आले आहेत तर आज जिल्ह्यात एकाही रुग्णांची मृत्यूची नोंद नाही हे विशेष.

            जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 2918 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 33 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2885 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 728 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 286 तर गृह विलगीकरणात 442 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72452 झाली आहे. 24 तासात 68 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 69945 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1779 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 53 हजार 892 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 80 हजार 410 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.08 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.13  आहे तर मृत्युदर 2.46 आहे.             

         पॉझेटिव्ह आलेल्या 33 जणांमध्ये 21 पुरुष आणि 12 महिला आहेत. यात आर्णी तालुक्यातील 1, बाभूळगाव येथील 3, दिग्रस 2, महागाव येथील 4, मारेगाव 3, पांढरकवडा 2, पुसद येथील 6, उमरखेड 3, वणी येथील 1, यवतमाळ 6 तर झरीजामणी येथील 2 रुग्ण आहे.        

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2070 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 209 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2070 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 80 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 497 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 75 रुग्णांसाठी उपयोगात तर 451 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 54 उपयोगात तर 1122 बेड शिल्लक आहेत.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी