24 तासात कोरोनाबधितांपेक्षा कोरोनामुक्त दुप्पट

 


* जिल्हयात 123 कोरोनामुक्त, 60 पॉझेटिव्ह,

* जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 2039 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 5 जून :  जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. आज 123 जण कोरोनामुक्त  झाले असून 60 जण पॉझेटिव्ह आले तसेच आज  3 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यातील दोन मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर एक  मृत्यू खाजगी रुग्णालयात झाले आहे.

            जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 4134 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 60 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4074 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 846 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 381 तर गृह विलगीकरणात 465 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72346 झाली आहे. 24 तासात 123 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 69722 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1778 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 44 हजार 539 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 70 हजार 983 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.22 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी  दर 1.45 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.            

         पॉझेटिव्ह आलेल्या 60 जणांमध्ये 37 पुरुष आणि 23 महिला आहेत. यात आर्णी येथील 4, बाभुळगाव येथील 3, दारव्हा येथील 8, दिग्रस येथील 0, घाटंजी 0, कळंब 2,   महागाव येथील 1,  मारेगाव येथील 2, नेर येथील 2, पांढरकवडा 2, पुसद येथील 2, राळेगाव 0, उमरखेड 0,   वणी येथील 16, यवतमाळ 10 तर झरीजामणी येथील 6  रुग्ण आहे.  

        मृत्यू झालेल्या 3 व्यक्तींमध्ये 2 व्यक्ती यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाभूळगाव तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, तर दारव्हा  तालुक्यातील 60  वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.  खाजगी रुग्णालायत वाशीम जिल्ह्याच्या मानोरा येथील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2039 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 240 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2039 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 74 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 503 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 75 रुग्णांसाठी उपयोगात तर 451 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 91 उपयोगात तर 1085 बेड शिल्लक आहेत.

0000000

 

 

Comments

  1. Borgata Hotel Casino & Spa - Mapyro
    Get directions, reviews and information for Borgata Hotel 전라북도 출장안마 Casino & 전라남도 출장마사지 Spa 양산 출장마사지 in Atlantic 안양 출장안마 City, NJ. Borgata Hotel Casino & Spa Borgata Hotel 강원도 출장안마 Casino & Spa.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी