जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा घसरला

 


24 तासात जिल्हयात 35 कोरोनामुक्त, 10 पॉझेटिव्ह,  एक मृत्यू

Ø  जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 2186 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 14 जून :  जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 10 जण पॉझेटिव्ह तर 35 जण कोरोनामुक्त झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 1083 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 10 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1073 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 445 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 105 तर गृह विलगीकरणात 340  रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72564 झाली आहे. 24 तासात 35 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 70334 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1785 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 65 हजार 421 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 92 हजार 857 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.90 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.92  आहे, तर मृत्युदर 2.46 आहे.            

पॉझेटिव्ह आलेल्या 10 जणांमध्ये 6 पुरुष आणि 4 महिला आहेत. यात आर्णी तालुक्यातील 1, दारव्हा येथील 1, दिग्रस तालुक्यातील 1, नेर 1, राळेगाव 1, यवतमाळ येथील  2, तर  झरीजामनी  येथील 1 तर इतर शहरातील 2  रूग्णाचा समावेश आहे.  

आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेर शहरातील 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2186 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 93 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2186 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 44 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 533 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 39 रुग्णांसाठी उपयोगात तर 487 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 10 उपयोगात तर 1166  बेड शिल्लक आहेत.

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी