Posts

Showing posts from June, 2019

क्लेम केलेल्या शेतक-यांना पिक विम्याचा लाभ त्वरीत द्या - परिवहन मंत्री रावते

Image
v सावरला आणि वणी येथे शेतकरी संवाद यवतमाळ, दि. 30 : शेतक-यांना मिळणा-या पीक विम्याची बहुतांश रक्कम शासनातर्फे भरली जाते. शेतक-यांना केवळ नाममात्र रकमेचा भरणा करावा लागतो. ज्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे व ज्यांनी क्लेम केले आहे अशा शेतक-यांना पीक विम्याचा त्वरीत लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सुचना परिवहन व खारभुमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी केलया. वणी तालुक्यातील सावरला व वणी येथे शेतक-यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, जिल्हा अधिक्षक व कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, अविनाश सोमलकर, तहसीलदार श्याम धनमने, सरपंच विनोद चोपणे आदी उपस्थित होते. विमा संदर्भात अनेक शेतक-यांच्या तक्रारी येतात, असे सांगून परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, शेतक-यांना विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठीच शेतकरी संवाद घेण्यात येत आहे. क्लेम मंजूर झाला असेल आणि बँकेच्या काही अडचणी असेल तर त्या त्वरीत सोडवाव्यात. विमा कंपनीने शेतक-यांना

सामाजिक न्याय दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Image
          यवतमाळ, दि. 26 :   सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभाग व समाजकल्याण विभागातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे तर प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत, संशोधन अधिकारी एम.जी. वथ, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, जि.प. समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण, दलितमित्र पुरस्कार विजेते श्री. सोनवणे आदी उपस्थित होते.             यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराजांनी समतेची शिकवण दिली आहे. सर्व घटकांना सामाजिक न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. मागासवर्गीयांसाठी शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षणाची सुरुवात शाहू महाराजांनी केली. समाजातील दुर्बल घटकांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी त्यांनी वसतीगृहे उघड

पीक कर्ज वाटपात टाळाटाळ खपवून घेणार नाही

Image
v किशोर तिवारी यांनी घेतली बँक अधिका-यांची बैठक          यवतमाळ, दि. 24 :    खरीप हंगामात शेतक-यांना पीक कर्ज मिळवून देणे हे शासनाचे धोरण आहे. शेतकरी सावकाराच्या दारात किंवा इतर खाजगी कंपन्यांच्या दारात जाता कामा नये. यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी कोणत्याही परिस्थितीत शेतक-यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. यात बँकांकडून होणारी हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे प्रतिपादन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.             गत दोन दिवसात जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ या विशेष मोहिमेचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुहास ढाले, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते.             जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत 70 टक्के शेतक-यांना पीक कर्ज वाटप केले आहे, असे सांगून किशोर तिवारी म्हणाले, जिल्ह्यात भ

जिल्हाधिका-यांनी घेतली बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक

Image
              यवतमाळ, दि. 24 :    खरीप हंगाम व पेरणीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी प्रभारी कृषी विकास अधिकारी पंकज बराडे व विविध बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.             मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकरी अजय गुल्हाने म्हणाले, दोन वर्षापूर्वी जिल्ह्यात किटकनाशक फवारणीच्या दुर्देवी घटना घडल्या होत्या. मात्र गतवर्षी प्रशासन, कृषी विभाग तसेच आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने त्याची पुनरावृत्ती झाली नाही. यावर्षीसुध्दा ही काळजी सर्वांना घ्यावयाची आहे. त्यासाठी बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी, किटकनाशक वितरक, विक्रेते आदींचे सहकार्य आवश्यक आहे. फवारणी करणारे शेतकरी, शेतमजूर आदींचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. तसेच किटकनाशक फवारणीबाबत जनजागृती शिबिरेसुध्दा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.             बियाणे, किटकनाशक वितरक आणि विक्रेत्यांनी शेतकरी प्रशिक्षण आणि जनजागृती शिबिराबाबत वेळापत्रक तयार करावे. तसेच आपल्या सामाजिक द

भूकंप परिस्थितीत घ्यावयाच्या काळजीबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना

v अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन v मदतीकरीता नियंत्रण कक्ष क्रमांक 07232-240720 व 07232- 255077 यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यातील उमरखेड, दिग्रस, महागाव, घाटंजी, आर्णि आणि दारव्हा तालुक्यातील 24 गावांमध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार दि. 21 जून रोजी रात्री 9.22 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. यात उमरखेड तालुक्यातील कुरळी, नारळी, बोरगाव, साखरा, निंगनूर, अकाली, मल्याळी, ढाकणी, बिटरगाव, खरुस, चातारी, एकांबा, टेंभुरदराच, आर्णि तालुक्यातील राणी, धानोरा, अंजनखेड, साकूर, मुकिंदपूर, महागाव तालुक्यातील हिवरा संगम, इंजनी, घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा, कुरली, दिग्रस तालुक्यातील सिंगद आणि दारव्हा तालुक्यातील खोपडी या गावांचा समावेश आहे. हा भूकंप रिक्टर स्केलवर 3.7 तिव्रतेचा होता. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात खबरदारी म्हणून नागरिकांनी काय करावे किंवा काय करू नये, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सुचनांचे पालन करावे व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. भूकंपादरम्यान काय करावे :

जमीन हडपल्याप्रकरणी पुसद येथे अवैध सावकारावर धाड

Image
v सहाय्यक निबंधक कार्यालयाची कारवाई          यवतमाळ, दि. 21 :    शेतक-याची जमीन हडपल्याप्रकरणी पुसद येथील अवैध सावकारावर धाड टाकून महत्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. ही कारवाई पुसद येथील सहकारी संस्था तथा सावकाराचे सहाय्यक निबंधक कार्यालयाने केली. अवैध सावकारीमध्ये जमीन हडपल्याबाबत संभाजी लिंबाजी मुरमुरे (रा.बिजोरा ता.महागाव) व उकंडा पुंजाजी पांडे (रा. राजुरा ता. महागाव) यांनी 23 एप्रिल 2019 रोजी पुसद येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील अवैध सावकार सुरज माधवराव वैध व माधवराव रुखमाजी वैध यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीवर कार्यालयात सुनावणी होती. अवैध सावकार वैध यांना जमिनीचे दस्तावेज तसेच अवैधरित्या ताब्यात असलेली चल, अचल संपत्ती सादर करण्यास फर्माविण्यात आले. मात्र त्यांनी याप्रकरणी कोणतेही दस्तऐवज सादर केले नाही. त्यामुळे याप्रकरणी झडती घेण्याचे आवश्यक वाटल्याने सहाय्यक निबंधक यांनी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये अधिकाराचा वापर करून झडती घेतली. यात काही महत्वपूर्ण दस्तावेज ताब्यात घेण्यात आले. ही क

जिल्हा प्रशासन व सामाजिक संघटनांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन

Image
v पालकमंत्री व जिल्हाधिका-यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन v नागरिकांसह अधिकारी व कर्मचा-यांनी केली योगासने          यवतमाळ, दि. 21 :    जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पतंजली योग समिती, श्री. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच योगाक्षेत्रात कार्यरत विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हेलिपॅड ग्राऊंड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा तर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधिक्षक एम.राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, एसबीआयचे शाखा प्रबंधक सुहास ढोले, बीएसएनएलचे उपमहाप्रबंधक डी.एस.डांगे, पतंजली योग समितीचे दिनेश राठोड, शंतनु शेटे, राजू पडगीलवार, मोहन तिवसकर आदी उपस्थित होते.             यावेळी ज्ञानेश्वर सुरजुसे, संजय चाफले, महेश जोशी, माया चव्हाण, मनिष गुबे या योगशिक्षकांनी उपस्थितांना विविध योगासने करून दाखविली. तसेच नागरिकांकड

आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके 23 जून रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Image
यवतमाळ, दि. 21 : आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके हे रविवार दिनांक 23 जून रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पूढीलप्रमाणे आहे. रविवार दिनांक 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 वाजता नागपूर येथून पुलगांव मार्गे देवगाव, ता. धामणगांवकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता देवगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9.45 वाजता बाभुळगाव शहराकडे (जि.यवतमाळ) प्रयाण. सकाळी 10 वाजता बाभुळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता कळंबकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता कळंब येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वाजता श्री.चिंतामणी गणपती मंदीर, कळंब येथे दर्शन व भेट. दुपारी 12 वाजता राळेगावकडे   प्रयाण. दुपारी 1 वाजता राळेगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता राळेगाव येथून वडकीकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता वडकी येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता खैरीकडे प्रयाण. सायंकाळी 4 वाजता खैरी येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4.30 वाजता यवतमाळकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन व राखीव. सायंकाळी 7 वाजता गुरुदेव मंगल कार्यालय, दारव्हा रोड, यवतमाळ येथे आदिवासी समाज बांधवाकडून आयोजित केलेल्य

हार, तु-याने स्वागत नको गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वह्या भेट द्या

Image
v आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचे आवाहन यवतमाळ, दि. 21 : राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा त्रस्त आहे. यावर मात करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मंत्रीपद मिळाल्यामुळे सामान्य नागरिक व कार्यकर्ते आनंदी असले तरी दुष्काळाच्या परिस्थितीची मला जाणीव आहे. त्यामुळे जनतेने भेटीला येतांना स्वागतासाठी हार व पुष्पगुच्छ न आणता वह्या भेट द्याव्यात. जेणेकरून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याला सामाजिक हातभार लाभेल, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी निवेदनातून केले आहे. डॉ. अशोक उईके यांचा मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर 23 जून रोजी प्रथमच ते जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शेतकरी आणि सामान्य माणसाचे दुःख काय असते, याची मला जाणीव आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर सर्वसामान्य माणसाला झालेला आनंद मी अनुभवत आहे. मात्र याचा बडेजाव न करता नागरिकांनी दुष्काळी स्थिती लक्षात घेता हार व पुष्पगुच्छऐवजी वह्या देऊन स्वागत केल्यास मला जास्त आनंद होईल. विशेष म्हणजे शैक्षणिक सत्राला

अनधिकृत बि-बियाणे विक्री प्रतिबंध व किटकनाशक हाताळणी पूर्वतयारीबाबत जिल्हाधिका-यांनी घेतली कृषी व पोलिस विभागाची बैठक

Image
यवतमाळ, दि. 21 : खरीप हंगामामध्ये अनधिकृत कपाशी बियाणे / तणनाशक, सहनशील कपाशी बियाणांची विक्री, वापर आणि वाहतुकीवर प्रतिबंध करणे तसेच विषबाधा होऊ नये म्हणून किटकनाशक हाताळतांना शेतकरी आणि शेतमजुरांसाठी पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कृषी, आरोग्य व पोलिस विभागाची आढावा बैठक घेतली.             जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपअधिक्षक (गृह) अनिलसिंह गौतम, डॉ. कोषटवार, डॉ. घोडेस्वार, उपविभागीय कृषी अधिकारी कैलाश वानखेडे, डॉ. प्रशांत नाईक, उदय काथोडे, जगन राठोड, कृषी विकास अधिकारी पंकज बरडे आदी उपस्थित होते.             यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, अनधिकृत बि-बियाणांना प्रतिबंध करण्यासाठी व्यापक मोहीम राबविणे गरजेचे आहे. यापूर्वी पकडलेल्या प्रकरणात पोलिस विभागाने तात्काळ कार्यवाही करावी. कृषी विभाग ज्या ठिकाणी धाड टाकणार आहे, अशा ठिकाणी पोलिस विभागाने बिट जमादार व शिपाई न देता अधिकारी व इतर कर्मचारी उपलब्ध करून द्यावे. जिल्ह्याच्या सिमेला लागून असलेल्या तेलंगणा

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप करावे

Image
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बँक अधिकाऱ्यांची झाडा-झडती यवतमाळ, दि. 17 : जिल्ह्याला यावर्षी खरीप हंगामाचे 2161 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यात आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 66 टक्के कर्ज वाटप केले आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँका यात माघारल्या असून त्याचे कर्ज वाटप केवळ 16 टक्के आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज वाटपाची आपली प्रगती तात्काळ सुधरवावी. त्यासाठी शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सक्त सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कर्ज वाटपाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, यांच्यासह बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. खरीप हंगामाला सुरवात होताच शेतकरी पीक कर्जासाठी बँकांकडे धाव घेतो, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले. कर्जवाटपाबाबत बँकेच्या अधिका-यांनी संवेदनशीलपणे काम करावे. आतापर्यंत जिल्ह्यात 29 टक्के कर्जवाटप झाले आहे. गतवर्षी या वेळेसपर्यंत 19

त्रस्त कुटुंबास पेरणी/बियाणे करीता पाच हजार रुपयांपर्यंत मदत

v बळीराजा चेतना अभियानच्या ग्रामस्तरीय समित्यांमार्फत होणार वाटप          यवतमाळ, दि. 14 :    बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्ह्यात 1483 ग्रामस्तरीय समित्या कार्यरत आहेत. या समित्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम 2019-20 करीता गावातील त्रस्त कुटुंबास पेरणी / बियाणांकरीता पाच हजार रुपयांपर्यंतची मदत देण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आदी कारणांमुळे नैराश्यग्रस्त असलेल्या शेतक-यांचे मनोबल उंचावणे, त्यांच्यामध्ये जगण्याची प्रेरणा निर्माण करणे याकरीता जिल्ह्यात विशेष मदत कार्यक्रमांतर्गत बळीराजा चेतना अभियान सुरू करण्यात आले. या अंतर्गत ग्रामसभेने मंजूरी दिलेल्या त्रस्त कुटुंबास पेरणी / बियाणे करीता एका प्रकरणी जास्तीत जास्त पाच हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याबाबत तरतूद आहे. जिल्ह्यातील प्रति ग्रामस्तरीय समिती 24 हजार रुपये याप्रमाणे एकूण 1483 ग्रामस्तरीय समित्यांना 3 कोटी 55 लक्ष 92 हजार इतका निधी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सदर निधीतून सन 2019 च्या खरीप हंगामाकरीता गावातील ग्रामसभेने बहुसंख्येने मंजुरी दिलेल्या त्रस्त

कळंब तालुक्यात 17, 18 व 19 जून रोजी पीक कर्ज वाटप मेळावे

v सभासद शेतक-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन          यवतमाळ, दि. 14 :    सन 2019-20 या खरीप हंगामात शेतक-यांना पेरणी करण्यासाठी वेळेवर पीक कर्ज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कळंब तालुक्यात तीन दिवस पीक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 17, 18 व 19 जून रोजी होणा-या या मेळाव्यांना शेतकरी सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.             17 जून 2019 रोजी सकाळी 11 वाजता जोडमोहा (ता. कळंब) येथील राम मंदिरात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा जोडमोहा व बँक ऑफ बडोदा, शाखा जोडमोहा यांच्यावतीने मेळाव्याचे आयोजन आहे. यात जोडमोहा, मेटीखेडा, नांझा, डोंगरखर्डा, पहुर, शिवणी, बेलोरी, झाडकिन्ही, पोटगव्हाण, रुढा, शरद, किन्हाळा आणि अंतरगाव येथील संलग्न संस्था सहभागी राहतील.             18 जून 2019 रोजी सकाळी 11 वाजता कळंब येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (शाखा कळंब), बँक ऑफ बडोदा (शाखा कळंब), भारतीय स्टेट बँक (शाखा कळंब), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (शाखा कळंब) आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया (शाखा कोठा) यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन आहे. यात कळंब

फासेपारधी समाजाच्या समस्यांसंदर्भात जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक

Image
v विविध योजनेंतर्गत लाभ देण्याचे अधिका-यांना निर्देश          यवतमाळ, दि. 13 :    जिल्ह्यातील पारधी बेड्यावर राहणा-या फासेपारधी समाजाच्या विविध समस्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, दारव्हाचे तहसीलदार अरुण शेलार, दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले, सहदेव पवार, पारधी समाज संघटनेचे बाबाराव राठोड आदी उपस्थित होते.             यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, फासेपारधी समाजाला मुलभूत सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. शिधापत्रिका, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, जातीचा दाखला आदी आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी उपविभागीय अधिका-यांनी विशेष मोहीम हाती घ्यावी. जिल्ह्यातील विविध पारधी बेड्यांवर महिलांचे बचत गट निर्माण करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने नियोजन करावे. या महिला बचत गटांना उमेदमार्फत आर्थिक लाभ देण्यात येईल. सुशिक्षित समाजबांधवांना रोजगारासाठी मुद्रा ब

ढाणकी नगर पंचायत आरक्षण सोडत 13 जून ते 20 जूनपर्यंत हरकती व सूचना आमंत्रित

यवतमाळ, दि. 12 : जिल्ह्यातील ढाणकी नगरपंचायतीच्या (क वर्ग) आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरीता दिनांक 10 जून 2019 रोजी सकाळी 11 वाजतापासून सोडत पध्दतीने आरक्षण निश्चित करण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ढाणकी नगरपंचायतची यापुढे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहराची विभागणी नवीन प्रभागात केली आहे. त्यांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा व सिमा प्रदर्शित केलेल्या प्रारुप रचनेचा मसुदा ढाणकी नगरपंचायत कार्यालयाच्या सुचना फलकावर तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सुचना फलकावर आणि yavatmal.nic.in या संकेतस्थळावर दिनांक 13 जून 2019 रोजी प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, उमरखेड तहसिल कार्यालय व नगरपंचायत ढाणकी येथे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल. ढाणकी नगरपंचायत क्षेत्रातील ज्या नागरिकांना या संबंधात काही हरकती व सूचना दाखल करावयाच्या असतील त्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयात दिनांक 13 जून 2019 ते दिनांक 20 जून 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात कारणासहीत हरकती व सुचना सादर कराव्यात. त्यानंतर येणाऱ्या हरकती व सूचना वि

शहरी आवास योजनेसाठी पालिकांच्या मुख्याधिका-यांनी पुढाकार घ्यावा - पालकमंत्री मदन येरावार

यवतमाळ, दि. 12 :  सन 2022 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेची वेगाने अंमलबजावणी होत आहे. मात्र नगर पालिका क्षेत्रात हा वेग कमी आहे. त्यामुळे प्रधानमंत्री शहरी आवास योजना वेगाने कार्यान्वित करण्यासाठी सर्व नगर पालिकांच्या मुख्याधिका-यांनी पुढाकार घ्यावा, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी केल्या.             जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री शहरी आवास योजनेंतर्गत लाभार्थी पुरस्कृत बांधकामाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, डीआरडीएचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे, कळंबचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, दिग्रसचे मुख्याधिकारी शेषराव टाले आदी उपस्थित होते.             प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सरकार पैसे देत आहे. सर्वांनाच आपले हक्काचे घर पाहिजे असते. त्यासाठी लोकांकडून अर्ज देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे बांधकाम परवानग्या त्वरीत देण्यात याव

राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज वाटपाची गती वाढवावी - पालकमंत्री मदन येरावार

Image
v दुष्काळ निवारणासंदर्भात आढावा बैठक v जिल्ह्यात 33 के.व्ही. व 11 के.व्ही. साठी दुहेरी जोडणीचे नियोजन         यवतमाळ, दि. 12 :   दरवर्षीपेक्षा यावर्षी पीक कर्जासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे. शासनाने एनपीएची रक्कम बँकांना दिली आहे. त्यामुळे शेतक-यांना खरीप हंगामात वेळेवर पीक कर्ज मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जवाटपाची गती वाढवावी, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी केल्या.             जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारण व इतर विषयांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगिता राठोड आदी उपस्थित होते.             जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकांची पीक कर्ज वाटपाची गती कमी आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, पीक कर्जासाठी जिल्ह्यातील सर्व गावे बँकांना दत्तक देण्यात आली आहे. प्रशासनाने कर्ज वाटपाचा वारंवार आढावा घ्यावा. तसेच शेतक-यांना कर्ज वाटप अधिक गतीने कसे मिळवून देता येईल, याबाबत निय

पिण्याचे पाणी, रोजगार, शिक्षण, आरोग्याला खनिज विकास निधीतून भरघोस निधी - पालकमंत्री मदन येरावार

Image
v जिल्हास्तरीय खनिज विकास प्रतिष्ठानची बैठक यवतमाळ, दि. 6 : जिल्ह्यात राबविण्यात येणा-या विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समिती तसेच इतर शिर्षकांमधून निधी दिला जातो. मात्र विकास कामे करण्याकरीता अतिरिक्त निधीची आवश्यकता असली तर खनिज विकास निधीतून ही कामे केली जातात. मुलभुत गरजा लक्षात घेता नागरिकांना पिण्याचे पाणी, रोजगार, शिक्षण आणि आरोग्यासाठी आता खनिज विकास निधीतून 70 ते 80 कोटी रुपये देण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खनिज विकास प्रतिष्ठानच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी आदी उपस्थित होते. जिल्ह्याचा खनिज विकास निधी हा डिपॉझिट निधी असतो, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यातील सर्व जीर्ण अंगणवाड्यांच्या इमारतींचे नवीन बांधकाम तसेच इमारती चांगल्या असल्यास मुलभूत सोयीसुविधांची पुर्तता याकरीता जिल्हा परिषदेने खनिज विक