कळंब तालुक्यात 17, 18 व 19 जून रोजी पीक कर्ज वाटप मेळावे


v सभासद शेतक-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
        यवतमाळ, दि. 14 :  सन 2019-20 या खरीप हंगामात शेतक-यांना पेरणी करण्यासाठी वेळेवर पीक कर्ज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कळंब तालुक्यात तीन दिवस पीक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 17, 18 व 19 जून रोजी होणा-या या मेळाव्यांना शेतकरी सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
            17 जून 2019 रोजी सकाळी 11 वाजता जोडमोहा (ता. कळंब) येथील राम मंदिरात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा जोडमोहा व बँक ऑफ बडोदा, शाखा जोडमोहा यांच्यावतीने मेळाव्याचे आयोजन आहे. यात जोडमोहा, मेटीखेडा, नांझा, डोंगरखर्डा, पहुर, शिवणी, बेलोरी, झाडकिन्ही, पोटगव्हाण, रुढा, शरद, किन्हाळा आणि अंतरगाव येथील संलग्न संस्था सहभागी राहतील.
            18 जून 2019 रोजी सकाळी 11 वाजता कळंब येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (शाखा कळंब), बँक ऑफ बडोदा (शाखा कळंब), भारतीय स्टेट बँक (शाखा कळंब), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (शाखा कळंब) आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया (शाखा कोठा) यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन आहे. यात कळंब, माणकापूर, धोत्रा, चापर्डा, नरसापूर, आष्टा, राजूर, कात्री, दोनोडा – 1, दोनोडा -2, हुसनापूर, सुकळी, पार्डी, निलज, कोठा, हिवरा येथील संलग्न संस्था सहभागी राहतील.
            19 जून रोजी सकाळी 11 वाजता सावरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (शाखा कळंब), बँक ऑफ महाराष्ट्र (शाखा पिंपळगाव) आणि बँक ऑफ बडोदा (शाखा सावरगाव) यांच्यावतीने पिंपळगाव, उमरी, सोनेगाव, सावरगाव, वंडली, परसोडी (बु.), परसोडी (खु.), टालेगाव, चिंचोली येथील संलग्न संस्था सदर मेळाव्याकरीता उपस्थित राहतील.
            वरील तिनही पिक कर्ज वाटप मेळाव्याला उपरोक्त गावांतील बँकांच्या सभासद शेतक-यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कळंब येथील तहसीलदार आणि सहकारी संस्थेचे सहकार अधिकारी यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी