जमीन हडपल्याप्रकरणी पुसद येथे अवैध सावकारावर धाड


v सहाय्यक निबंधक कार्यालयाची कारवाई
        यवतमाळ, दि. 21 :  शेतक-याची जमीन हडपल्याप्रकरणी पुसद येथील अवैध सावकारावर धाड टाकून महत्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. ही कारवाई पुसद येथील सहकारी संस्था तथा सावकाराचे सहाय्यक निबंधक कार्यालयाने केली.
अवैध सावकारीमध्ये जमीन हडपल्याबाबत संभाजी लिंबाजी मुरमुरे (रा.बिजोरा ता.महागाव) व उकंडा पुंजाजी पांडे (रा. राजुरा ता. महागाव) यांनी 23 एप्रिल 2019 रोजी पुसद येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील अवैध सावकार सुरज माधवराव वैध व माधवराव रुखमाजी वैध यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीवर कार्यालयात सुनावणी होती. अवैध सावकार वैध यांना जमिनीचे दस्तावेज तसेच अवैधरित्या ताब्यात असलेली चल, अचल संपत्ती सादर करण्यास फर्माविण्यात आले. मात्र त्यांनी याप्रकरणी कोणतेही दस्तऐवज सादर केले नाही. त्यामुळे याप्रकरणी झडती घेण्याचे आवश्यक वाटल्याने सहाय्यक निबंधक यांनी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये अधिकाराचा वापर करून झडती घेतली. यात काही महत्वपूर्ण दस्तावेज ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पुसद येथील सावकाराचे सहाय्यक निबंधक सुनिल भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार अधिकारी अनिल सुरपाम, महागाव येथील सहकार अधिकारी डी. यु. खुरसडे तसेच दिग्रस येथील सहकार अधिकारी एस.आर.अभ्यंकर यांनी केली. यावेळी पंच म्हणून पुसद येथील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष जी.एस.तरासे व सावरगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीचे गटसचिव डी. बी.जाधव यांनी कामकाज पाहिजे. सदर कारवाईत पोलीस उपनिरिक्षक एस.सी.दोडके, पोलिस शिपाई के.एस.जायभाये, वर्षा पाईकराव यांचा सहभाग होता.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी