शहरी आवास योजनेसाठी पालिकांच्या मुख्याधिका-यांनी पुढाकार घ्यावा - पालकमंत्री मदन येरावार


यवतमाळ, दि. 12 :  सन 2022 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेची वेगाने अंमलबजावणी होत आहे. मात्र नगर पालिका क्षेत्रात हा वेग कमी आहे. त्यामुळे प्रधानमंत्री शहरी आवास योजना वेगाने कार्यान्वित करण्यासाठी सर्व नगर पालिकांच्या मुख्याधिका-यांनी पुढाकार घ्यावा, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी केल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री शहरी आवास योजनेंतर्गत लाभार्थी पुरस्कृत बांधकामाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, डीआरडीएचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे, कळंबचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, दिग्रसचे मुख्याधिकारी शेषराव टाले आदी उपस्थित होते.
            प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सरकार पैसे देत आहे. सर्वांनाच आपले हक्काचे घर पाहिजे असते. त्यासाठी लोकांकडून अर्ज देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे बांधकाम परवानग्या त्वरीत देण्यात याव्या. मुख्याधिका-यांच्या पुढाकारशिवाय ही योजना गतीमान होऊ शकत नाही. या योजनेकरीता पालिका क्षेत्रात ज्या अभियंत्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्यांना उद्दिष्ट ठरवून द्या व कामाचा पाठपुरावा करा, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बांधकाम कामगारांसाठी असलेल्या अटल आवास योजनेचासुध्दा आढावा घेतला.
            बैठकीला नगर पालिकांचे मुख्याधिकारी तसेच अभियंते उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी