ढाणकी नगर पंचायत आरक्षण सोडत 13 जून ते 20 जूनपर्यंत हरकती व सूचना आमंत्रित


यवतमाळ, दि. 12 : जिल्ह्यातील ढाणकी नगरपंचायतीच्या (क वर्ग) आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरीता दिनांक 10 जून 2019 रोजी सकाळी 11 वाजतापासून सोडत पध्दतीने आरक्षण निश्चित करण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ढाणकी नगरपंचायतची यापुढे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहराची विभागणी नवीन प्रभागात केली आहे. त्यांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा व सिमा प्रदर्शित केलेल्या प्रारुप रचनेचा मसुदा ढाणकी नगरपंचायत कार्यालयाच्या सुचना फलकावर तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सुचना फलकावर आणि yavatmal.nic.in या संकेतस्थळावर दिनांक 13 जून 2019 रोजी प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, उमरखेड तहसिल कार्यालय व नगरपंचायत ढाणकी येथे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल.
ढाणकी नगरपंचायत क्षेत्रातील ज्या नागरिकांना या संबंधात काही हरकती व सूचना दाखल करावयाच्या असतील त्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयात दिनांक 13 जून 2019 ते दिनांक 20 जून 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात कारणासहीत हरकती व सुचना सादर कराव्यात. त्यानंतर येणाऱ्या हरकती व सूचना विचारात घेण्यात येणार नाही. ज्या कोणत्याही व्यक्तीचे लेखी हरकती व सुचना जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होतील, त्यावर दिनांक 25 जून 2019 पर्यंत जिल्हाधिकारी, यवतमाळ हे सुनावणी घेतील, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी