Posts

Showing posts from 2024

मुलभूत कर्तव्ये या विषयावर कायदेविषयक शिबीर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधी चिकित्सालय, अमोलकचंद विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुलभुत कर्तव्ये या विषयावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मुनोत होते तर मुख्य अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार होते. प्रमुख वक्ते म्हणुन अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक संदिप नगराळे उपस्थित होते. वक्ते संदीप नगराळे यांनी मुलभुत कर्तव्ये व बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कर्तव्ये हे ४२ व्या संशोधनामुळे अंतर्भुत केले. २१ (अ) मोफत व सक्तीच्या शिक्षणिचा अधिकार सदर कलमान्वये प्रदान करण्यात आला, असे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्य अतिथी व मार्गदर्शक कुणाल नहार यांनी शालेय जिवनापासून महाविद्यालय आणि त्यानंतर एक नागरीक म्हणुन कर्तव्यपरायण व्हावे व मुलभुत कर्तव्य पार पाडावित, असे आवाहन केले. मोफत व सक्तीच्या शिक्षणाबाबत बोलतांना मुलांना ज्

चना खरेदीसाठी जिल्ह्यात सात खरेदी केंद्रे

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, झरी जामणी, पुसद, आर्णी, दिग्रस, बाभुळगांव या सात तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी खरेदी केंद्रावर दि.28 मार्च ते 25 जून पर्यंत सुरु राहणार आहे. खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, दिग्रस तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती दिग्रस, बाभुळगांव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, बाभुळगांव या केंद्रांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील चना खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी दि.28 मार्च पासून करण्यात येत असून प्रत्यक्षात चना खरेदी दि. 28 मार्च ते 25 जूनपर्यंत करण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, सातबारा उतारा, पिकपेरा व बँके पासबुकची झेरॉक्स प्रत संबंधित खरेदी केंद्रावर देवून

महाराष्ट्र विविध प्रथा, परंपरांनी नटलेले समृद्ध राज्य - संजय राठोड

Image
महाराष्ट्र विविध प्रथा, परंपरांनी नटलेले समृद्ध राज्य आहे. येथील साहित्य, संस्कृती, कला, संगीत, समृध्द गडकिल्ले महाराष्ट्राचे वैभव आहे. अशा राज्यात आपण वास्तव्य करतो, ही आपल्यासाठी देखील गौरवाची बाब आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्य ध्वजारोहन झाले. त्यावेळी शुभेच्छा देतांना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीस पालकमंत्र्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी अनेक मराठी बांधवांना सातत्याने संघर्ष करावा लागला. या संघर्षात 105 बांधवांना शहीद व्हावे लागले. या सर्व शहीदांना पालक

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 29 एप्रिल (जिमाका) : महाराष्ट्र दिनी विविध कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा. प्लॅस्टीक ध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यावर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजाण व जागरुक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलिस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. तसेच विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करु नये. प्लॅस्टीकचे ध्वज आढळून आल्यास संबंधित तहसिलदार किंवा नगरपालिका कार्यालयात असे ध्

खरीपात बियाणे, खते, किटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा -डॉ.पंकज आशिया

Image
Ø जिल्हाधिकाऱ्यांकडून खरीप हंगाम तयारीचा आढावा Ø जिल्ह्यात 8 लाख 97 हजार हेक्टरवर खरीप नियोजन Ø गेल्या हंगामात कमी कर्जवाटप करणाऱ्या बॅकांना नोटीस यवतमाळ, दि. 29 एप्रिल (जिमाका) : खरीप हंगाम काही दिवसांवर आला आहे. या हंगामात शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्धतेसह आवश्यक निविष्ठा जसे बियाणे, खते, किटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, याची दक्षता घ्या. हंमागाचे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी केल्या. महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप हंगाम नियोजन तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांच्यासह सर्व उपविभागीय कृषि अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात खरीप हंगामात 8 लाख 97 हजार 390 हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. त्यात कापूस सर्वाधिक 4 लाख 57 हजार 510 हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यापाठोपाठ सोयाबीन 2 लाख 94 हजार 260 तर तूर 1 लाख 15 हजार 400 हेक्टर लागवडीचे नियोजन आहे. खरीप ज्वार

आयआयएचटी प्रथम व द्वितीय सत्राकरीता प्रवेश सुरु

केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय सत्राकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून ईच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. प्रथम वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता १३ जागा व आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता १ जागा तसेच वेंकटगिरी करीता २ जागेच्या प्रवेशासाठी तसेच द्वितीय वर्षाकरीता ३ जागा (१ जागा आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता) पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांचे मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि. 10 जून पर्यंत मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपुर्ण अर्ज दि. 10 जून पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अन

शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फीचे अर्ज 30 एप्रिलपर्यंत स्विकारणार

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेचे नवीन व नूतनीकरणचे अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल ही आहे. या मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर मुदतवाढ ही अंतिम स्वरुपाची असल्याने दि. 30 एप्रिल पूर्वी अर्ज स्विकारण्याची कार्यवाही करण्यात येईल. या कालावधीनंतर अर्ज प्रलंबित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील, तसेच अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांना शिक्षण शुल्क घेता येणार नाही, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक मंगला मुन यांनी कळविले आहे. 000

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे मध्यस्थी जागृती कार्यक्रम

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर होते. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश अ. अ. लऊळकर तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधीश आर. एस. साळगांवकर व बी. एस. संकपाल, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव के. ए. नहार उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्हा मुख्यालयातील सर्व न्यायाधीश, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, पिएलव्ही, वकील मंडळी, पक्षकार तसेच न्यायालयील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. व्ही न्हावकर यांनी मध्यस्थी प्रक्रियेबाबत माहिती दिली. ठराविक प्रकरणात मध्यस्थी प्रक्रिया राबविता येतात. कौटुंबिक वाद, विवाह संबंधातील वाद, शेतीचे वाद असतील तर ते वाद मध्यस्थीने मिटविता येते. वकील लोकांनी मध्यस्थी प्रक्रियेमध्ये व लोकअदालतमध्ये भाग घ्यावा तसेच दोन्ही पक्षकाराच्या संवादाने वाद मिटतो, असे यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये सांगितले. या कार्यक्रमात बी. एस. संकपाल यांनी वैकल्पीक वा़द निवारण केंद्

अमरावती येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय व विद्यार्थी विकास विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस या नामांकित कंपनी करीता रोजगार मेळाव्याचे आयोजन दि.१९ मार्च रोजी विद्यापिठाच्या डॉ.ङी.के.देशमुख सभागृह येथे करण्यात आले आहे. या मेळाव्याकरीता अमरावती विभागातील किमान २०० पदवीधर, पदवी परिक्षेच्या अंतीम वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यामधे सहभाग घेण्याकरिता इच्छुक पदवीधर उमेदवारांनी https://forms.gle/३zvnHwm८ TRU९uB१N९ या लिंक वर क्लिक करून आपली नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उपआयुक्त द.ल. ठाकरे आणि सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे. शैक्षणिक पात्रता, निवड पध्दती, सोबत आणावयाचे दस्तऐवज याबाबतची माहिती वरील गुगल लिंकमध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी गुगल फार्म भरून प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 000

तणावातही पोलिस अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावतात - पालकमंत्री संजय राठोड

Image
पोलिस विभाग अत्यंत महत्वाचा विभाग आहे. समाजात शांतता, अलोखा राखण्याचे काम या विभागातील अधिकारी, कर्मचारी करत असतात. अलिकडे पोलिस विभागाचे काम प्रचंड वाढले आहे. कर्मचाऱ्यांची देखील कमतरता आहे, असे असतांना देखील प्रामाणितपणे कर्तव्य बजावले जातात, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हा पोलिस दलाच्यावतीने येथील कवायत मैदान येथे बांधण्यात आलेल्या आरोग्यम् पोलिस हेल्थ क्लबचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पियुष जगताप, कार्यकारी अभियंता दादासाहेब मुकडे आदी उपस्थित होते. अलिकडे मोबाईल, इंटरनेटमुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. अशा गुन्हेगारीवर आळा घालने फार मोठे आवाहन आहे. आमचा पोलिस विभाग समर्थपणे या आवाहनाचा सामना करत आहे. पुर्वी पोलिसांकडे ठराविक कामे होती. अलिकडे पोलिस विभागाचे कार्यक्षेत्र देखील वाढले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच सामाजिक पोलिसिंग करावी लागते.

जिल्ह्यातील तीन महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

राज्यामधील महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक-युवतींना व्हावा या दृष्टीकोनातून महाविद्यालयामध्ये महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील तीन केंद्राचा समावेश असून या केंद्राचे उद्गाटन नुकतेच झाले. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ, रामदास आठवले आर्ट सायन्स ज्युनिअर महाविद्यालय चिकणी (डो) ता.नेर, श्री. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मारेगाव या महाविद्यालयामध्ये महाविद्यालय कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी उद्घाटन कार्यक्रमास कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनप्रसंगी या योजनेचे नाव चाणक्य कौशल्य विकास केंद्र असे घोषित केले. देशाला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊन आर्थिक प्रगती मध्ये देश हा उच्च स्तरावर पोहचवण्याचे कार्य या विभागामार्फत होत आहे. युवकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. ज

कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन

वसंतराव नाईक कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.शिल्पा पोलमेल्लीवार, उपशिक्षणाधिकारी प्रा.अंजली गहरवाल, प्रा.धिरज वसुले व डॉ. प्रशांत शिंगोटे उपस्थित होते. डॉ.शिल्पा पोलपेल्लीवार यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी समाजात जगत असतांना स्वत:ची क्षमता ओळखून जागरूक व सक्षम असले पाहिजे. स्वत:मधील चांगल्या विचारांचा विकास करून व वाईट विचार काढून स्त्रीयांचे तेज उसळत असते. जीवनात पुढे जात असतांना चिकित्सक व संशोधनात्मक दृष्टीकोन बाळगल्यास स्वत:चे कौशल्य विकसित करून कुटुंबासाठी व समाजात जगता येते, असे सांगितले. डॉ. पार्लावार म्हणाले की, न्यूयार्क येथे महिलांनी कामाच्या जागी सुरक्षितता, दहा तासांचे काम व मतदानाचा हक्क या मागण्या केल्या होत्या. स्त्रीयांचा सन्मान, कर्तृत्व, सशक्तीकरण आत्मनिर्भर व सामाजिक समानतेचे महत्व पटवून देण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांना अमानवी पद्धतीने वागविणाऱ्या समाज व्

देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या शुरविरांचे स्मरण करणे प्रत्येकाचे कर्तव्य - पालकमंत्री संजय राठोड

Image
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या शुरविरांमुळे हा महोत्सव साजरा करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. अजूनही आपले शुर सैनिक देशाच्या सिमेवर देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्रपणे काम करत असतात. प्रसंगी आपले प्राण देखील गमावतात. अशा सर्व विरांचे स्मरण करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार व कृतज्ञता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, प्रकाश देशपांडे, रुपाली बेहरे, तहसिलदार निकेता जावरकर उपस्थित होते. स्वातंत्र्य लढ्यात अनेक शुर विर सहभागी झाले होते. आपल्या प्राणांची पर्वा न करता मातृभूमिच्या रक्षणासाठी या विरांनी शेवटच्या श्वासापर्यंत परकीय सत्तेशी लढा दिला. अजूनही देशाच्या सिमा सुरक्षित ठेवण्यासाठी देशाचा प्रत्येक सैनिक आपले कर्तव्य प्राणपणाने बजावत असल्या

आज जागतिक ग्राहक दिन व प्रदर्शनीचे आयोजन

दरवर्षी दि.१५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त ग्राहकांचे प्रबोधन व्हावे या दृष्टीकोनातून उद्या दि.१५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ग्राहक दिन व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम अन्न व औषध प्रशासन विभाग, वैधमापन शास्त्र विभाग, एस.टी. महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारत संचार निगम लिमिटेड, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, गॅस एजन्सीज, पेट्रोल पंप व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त गोपाल मोहोरे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष डॉ.नारायणराव मेहरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजेंद्र निमोदीया, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ आडे हे उपस्थित राहणार आहेत. पोलिस विभागाकडून सायबर क्राईम अंतर्ग

राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणाली अँपचे प्रशिक्षण

भारत सरकारच्या कृषि आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या क्षेत्रीय केंद्रीय एकात्मिक किड व्यवस्थापन केंद्र नागपुरच्यावतीने जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून आलेल्या प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणाली या अँपचे प्रशिक्षण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी अनिल राठी आणि कृषी विज्ञान केंद्र यवतमाळचे वैज्ञानिक डॉ.प्रमोद मगर यांनी कार्यक्रमात सहभागी राहुन मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील 20 प्रगतिशील शेतकऱ्यांनी भाग घेतला. भारत सरकारच्या कीटकशास्त्र सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी छाया पासी, वनस्पती रोग विज्ञानचे सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी स्वाती भुंबर तथा वैज्ञानिक सहाय्यक आश्मिना धाडसे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना या अँपबद्दल माहिती दिली. या अँपमुळे शेतकऱ्यांना सहज पध्दतीने किडीची ओळख कसे करायची आणि अँपमध्ये डेटा फिडिंग करून तेव्हाच्या तेव्हा विभागाच्या सल्ल्याचा फायदा कसा घ्यायचा हे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. त्याच बरोबर एकात्मिक किड व्यवस्थापन, मित्र

अन्न सुरक्षा अनुपालन प्रणाली प्रशिक्षण

राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागांतर्गत अनुदानित वसतिगृहातील अधीक्षक व स्वयंपाकी यांच्यासाठी फुड सेफ्टी कॉम्पलिअन्स सिस्टीम याविषयावर प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षण कार्यक्रम समाज कल्याण विभाग व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांचे सहाय्य लाभले. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गो.वि.माहोरे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश अन्न पदार्थ बनवताना व हाताळताना कशी काळजी घ्यावी व स्वच्छता कशी ठेवावी हा होता. सामाजिक न्याय भवन येथे आयोजित प्रशिक्षणात ८५ प्रशिक्षणार्थीना व दिनबाई मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह दिग्रस येथे आयोजित प्रशिक्षणात २०६ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले. दोन्ही ठिकाणी प्रशिक्षक अस्मीता ठवकार यांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षणार्थीना अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील तरतुदी, स्वच्छतेचे महत्त्व, विषबाधेसारख्या अप्रिय घटना टाळण्याच्या उपाययोजना, पौष्टिक घटकाची माहिती व

पशुधन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची पंचसूत्री

सद्यस्थितीत हवामान बदलामुळे शेतीव्यवसायात काहिशी अनिश्चितता निर्माण झाली आहे. शेतीला पूरक किंबहुना मुख्य व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी पशुसंवर्धनाशी संबंधित व्यवसायाची वाट निवडणे गरजेचे बनले आहे. त्यामुळेच यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासोबतच दुध व पशुधनात वाढ करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पंचसूची आणली आहे. यामुळे पशुधानाचे क्षेत्र विस्तारले जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा शेतकरी बांधवांना लाभ देत त्यांच्यामध्ये पुन्हा नवी उमेद जागविण्याचा व नवीन पशुउद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न पशुसंवर्धन विभाग या पंचसूचीच्या माध्यमातून करीत आहे. आगामी काळात राज्यात केवळ संख्यात्मक नाही, तर गुणात्मक पशुधनाची पिढी निर्माण करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रगत तंत्रज्ञानाच्या पथावर सर्जनशीलतेला गवसणी घालत आधुनिकतेकडे मार्गस्थ आहे. सुंदर, संपन्न व प्रगत महाराष्ट्राच्या या आश्वासक स्थित्यंतरात पशुसंवर्धन खात्यानेही ग्रामीण व पर्यायाने शहरी अर्थचक्र गतिमान करण्यासाठी भरीव योगदान दिले आहे. शाश्वत, आश्वासक व निर्णायक विकसित महाराष्ट्रा

महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती नोंदणी वाढविण्यासाठी 15 मार्चपर्यंत अर्ज करावेत

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी नोंदणी वाढवावी. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी मंजूर करावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. अनुसूचित जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रदाने, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना राबविण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षातील या योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 8 हजार 188 अर्जाची नोंदणी केली आहे, त्यापैकी महाविद्यालयांनी केवळ 4 हजार 529 अर्ज मंजूर केले आहे. महाविद्यालयस्तरावर 2 हजार 713 अर्ज प्रलंबित आहे. महाविद्यालयांनी विद्यापीठ व शिक्षण शुल्क सम

लोकअदालतमध्ये ग्रामपंचायतींकडील 1 कोटी 56 लाख थकीत रक्कमेची सामंजस्याने वसूली

जिल्ह्यातील 19 हजार 833 ग्रामपंचायतींची थकीत गृहकर व पाणीकराची प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्यात आली होती. या थकीत रक्कमेबाबत आपसी समझोता झाल्याने तब्बल 1 कोटी 56 लाख रुपयांची वसूली लोकअदालतमध्ये झाली आहे. या लोकअदालतमध्ये यवतमाळ पंचायत समितीमध्ये 2963 प्रकरणे ठेवण्यात आली होती. या प्रकरणांमध्ये 19 लाख 89 हजार इतकी गृहकर व पाणीकर वसूली झाले. कळंब मध्ये 1064 प्रकरणांमध्ये 18 लाख 35 हजार इतकी वसूली झाली आहे. राळेगावमध्ये 322 प्रकरणे तर 4 लाख 74 हजार वसूली, बाभूळगाव 1255 प्रकरणे तर 6 लाख 10 वसूली, नेरमध्ये 1256 प्रकरणे, 6 लाख 54 हजार वसूली, दारव्हा 632 प्रकरणे, 2 लाख 70 हजार वसूली, दिग्रस 2063 प्रकरणे, 11 लाख 60 हजार वसूली, पुसद 1124 प्रकरणे, 13 लाख 48 हजार वसूली, उमरखेडमध्ये 345 प्रकरणे 3 लाख 13 हजार वसूली, महागांव 581 प्रकरणे 1 लाख 40 हजार वसूली, आर्णी 2730 प्रकरणे 6 लाख 11 हजार इतकी वसूली झाली आहे. घाटंजीमध्ये 285 प्रकरणे 1 लाख 87 हजार वसूली, पांढरकवडा 3418 प्रकरणे 42 लाख 43 वसूली, वणी 485 प्रकरणे 7 लाख वसूली, मारेगाव मध्ये 772 प्रकरणे 6 लाख

नेर येथे १ कोटी ९५ लाखाच्या विकासकामांचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन

Image
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते नेर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. या विकासकामांची एकून किंमत १ कोटी ९५ लक्ष इतकी आहे. भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्र्यांसह नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज नाल्हे, गटविकास अधिकारी निलेश जाधव, भाऊराव ढवळे, सुभाष भोयर, रितेश चिरडे आदी उपस्थित होते. विकास कामांमध्ये नगर परिषदक्षेत्रांतर्गत वार्ड क्रमांक एक महादेव नगर मधील खुल्या जागेवर जेष्ठ नागरिक मंडळ योगा भवन बांधकाम करणे; खर्च ४० लाख. वार्ड क्रमांक एक संदीप नगर येथील विशाल राठोड ते नामदेव राठोड ते युवराज गजभिये ते बन्सोड ते हजारे ते घावडे ते गिरी व श्री.गादिया ते फिरके यांच्या घरापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे; खर्च १३ लाख ९१ हजार. वार्ड क्रमांक एक छत्रपती नगर येथील प्रदीप ठाकरे ते राजे संभाजी पार्क ते कापसीकर ते अवधुत परटक्के ते उघडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व कॉंक्रीट नाली; खर्च १८ लाख ९५ हजार. वार्ड क्रमांक तीन चिंतामणी चौक ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत कॉक्रिट रस्ता व नाली; खर्च १८ लाख ९८ हजार. वार्ड क्रमांक चार

शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे दि.11 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता शिकाऊ उमेदवार भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याकरीता रेमण्ड इको डेनिम प्रा.लि. यवतमाळ या आस्थापनेला जोडारी व आरएसी या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी व जय अँग्रो एजन्सी, यवतमाळ या आस्थापनेला यांत्रिक कर्षित्र या व्यवसायातील उत्तीर्ण तसेच अंतिम वर्षाला प्रशिक्षण घेणारे उमेदवार पात्र आहेत. प्रशिक्षणार्थ्यांनी मुळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतिसह सदर मेळाव्यास उपस्थित राहावे व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही.जे.नागोरे यांनी केले आहे. 000

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबाबत प्रबोधनपर कार्यशाळा

Image
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय व डॉ.बाबसाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा व सुधारीत अधिनियम या विषयावर एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रबोधनपर कार्यशाळा सामाजिक न्याय भवन येथे घेण्यात आली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, यशदाचे मास्टर ट्रेनर सुभाष केकान, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन नांदेडकर, सचिन गिरमे, रोहीत अवचरे तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री.कऱ्हाळे तसेच 300 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 व सुधारीत अधिनियम 2016 या विषयावर मागदर्शन केले. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत तालुकास्तरावर समिती गठीत करावी व कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची कारवाई करावी, असे निर्देश दिले. प्रास्ताविकात भाऊराव चव्हाण यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा व सुधारीत अधिनियम या विषयाबाबत मार्गदर्शन

गारमेंट क्लस्टर राज्यातील महिलांना स्फुर्ती देण्याचे काम करेल - डॅा.नीलम गोऱ्हे

Image
Ø धामनगाव देव येथे गारमेंट क्लस्टरचे उद्घाटन Ø 500 महिलांना मिळणार हक्काचा रोजगार Ø महिलांसाठी राज्यातील पहिलेच क्लस्टर महिलांना आर्थिकदृष्ट्या समृध्द करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. परंतू पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून धामनगाव देव येथे केवळ महिलांसाठी सुरु करण्यात आलेले गारमेंट क्लस्टर राज्यातील महिलांना स्फुर्ती देण्याचे काम करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे यांनी केले. दारव्हा तालुक्यातील धामनगाव देव येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे जिल्हा वार्षिक योजना, महिला व बालविकास विभागाच्यावतीने 3 टक्के निधीमधून महिलांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण आधारीत गारमेंट क्लस्टर सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कालींदा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी

यवतमाळात आजपासून महासंस्कृती महोत्सव

Image
Ø महोत्सवाचा लाभ घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन Ø गायक कैलास खेर, नंदेश उमप यांचे गायन Ø स्थानिक लोककला, संस्कृतीचे सादरीकरण Ø कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत कवी संमेलन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'महासंस्कृती महोत्सवाचे' उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते उद्या दि.७ मार्च रोजी समता मैदान येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांचा गीत संगीताचा कार्यक्रम होईल. उद्घाटन कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा, खा.भावना गवळी, खा.हेमंत पाटील, आ.अँड.निलय नाईक, आ.किरण सरनाईक, आ.धीरज लिंगाडे, आ.प्रा डॉ.अशोक उईके, आ.मदन येरावार, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.डॉ.संदीप धुर्वे, आ.नामदेव ससाने, आ.इंद्रनिल नाईक, विभागीय आयुक्त डॉ.निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड उपस्थित राहणार आहे. सदर महोत्सव सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने आयोजित करण्यात आला आह

विभागीय रोजगार मेळाव्यात 309 उमेदवारांची प्राथमिक निवड

Image
* 20 नामांकित कंपन्यांची उपस्थिती * मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 309 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. मेळावा उद्घाटन कार्यक्रमास एज्युकेशन सोसायटीचे सचिव धनंजय पांडे, विद्यापिठाच्या विद्यार्थी विभागाचे संचालक डॉ.राजीव बोरकर, लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दुर्गेश कुंटे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे, कौशल्य विकास अधिकारी पी.बी.जाधव, वैशाली पवार उपस्थित होते. मेळाव्यात रतन असोसिएट्स, युनिमॅक्स इंडिया हेल्थ केअर सेंटर, अलाईट रिसोर्स मॅनेजमेंट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पीपीएस एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, संसूर सृष्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, धूत ट्रान्समिशन, विनय ऑटोमोबाईल, हिंदुजा महिला मिल्क प्रोड्यूसर, व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेड, उत्क

रिझर्व्ह बँकेच्यावतीने क्षेत्रस्तरीय आर्थिक साक्षरता कार्यक्रम

Image
आर्थिक साक्षरता सप्ताहानिमित्त विद्यार्थी आणि युवकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर कार्यालयाच्यावतीने यवतमाळ येथे क्षेत्रस्तरीय आर्थिक साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बँकेच्या तज्ञांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक शशांक हरदेनिया, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक जी.एल.नरवाल, भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक कौस्तव चक्रवर्ती, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक दीपक पेंदाम, अग्रणी जिल्हा प्रबंधक अमर गजभिये आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील एकूण 200 जण सहभागी झाले होते. त्यात परिसरातील विद्यार्थी, बचत गट, शेतकरी, लघु उद्योजक, व्यवसाय प्रतिनिधी, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी आणि बँक अधिकारी यांचा समावेश होता. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या पदवीधरांनी त्यांची उत्पादने प्रदर्शित करणारे स्टॉलही या ठिकाणी लावले होते. चलनी नोटांची सुरक्षा वैशिष्ट्ये, डिजिटल बँकींग करताना काय करावे आणि काय करू नये, बँकांमधील तक्रार निवारण यंत्रणा आणि एकात्मिक

यवतमाळात उद्यापासून पाच दिवस महासंस्कृती महोत्सव

Image
Ø दिनांक 7 ते 11 मार्च दरम्यान आयोजन Ø गायक कैलास खेर, नंदेश उमप यांचे गायन Ø महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानी Ø कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत कवी संमेलन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यवतमाळ येथे 'महासंस्कृती महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि.7 ते 11 मार्च दरम्यान समता मैदानात होणार आहे. सुप्रसिद्ध गायक कैलास खेर, नंदेश उमप यांच्या गीत गायनासह विविध कार्यक्रमांचे सादरीकरण महोत्सवात होईल. महोत्सव तयारीचा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी आज महसूल भवन येथे आढावा घेतला. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, कार्यकारी अभियंता दादासाहेब मुकडे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महोत्सवात पहिल्या दिवशी दि.7 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता समई नृत्य व मंगळागौर तसेच सायंकाळी 7 वा ‘सुर नवा ध्यास नवा’ व सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम होईल. दि.8 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता ढेमसा

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक समाज प्रबोधनकार आणि समाज सेवकांना तसेच सदर समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना प्रतिवर्षी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्यात येतात. यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एक व्यक्ती व एक संस्था यांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्याचा निर्णय इतर बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या स्तरावर दिला जातो. पुरस्कारासाठी छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर पुरस्कार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच मे 2024 मध्ये देण्याचे प्रस्तावित आहे. या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याकरीता वीरशैव लिंगायत समाजाच्या इच्छुक असलेल्या व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडून दि.१५ मार्च पूर्वी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, यवतमाळ येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक मंगला मुन यांनी केले आहे. 000

कलावंतांनी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील राज्य शासनाच्या वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेच्या मानधनधारक कलावंतांना डीबीटी पध्दतीने थेट त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात मानधन जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कलावंतांनी यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य संचालकांच्या पत्रान्वये कलावंताचे मानधन हे दि.१ एप्रिल पासून डीबीटी पध्दतीने थेट त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्याकरीता सर्व मानधनधारक कलावंतांची आधारसलंग्न बँक खात्याची माहिती, आधारकार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांकाची माहिती दि.१० मार्च पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. सर्व मानधनधारक कलावंतानी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, आधारकार्डची झेरॉक्स, लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांक तसेच जे कलावंत मय्यत झाले असतील त्यांच्या मृत्यु प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत इत्यादी माहिती समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, यवतमाळ व संबधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती या कार्यालयास सादर करावी,असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी कळविले आहे. 000

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना लाभार्थी निवड

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसदच्यावतीने आदिवासी लाभार्थ्यांना केंद्रवती अर्थसंकल्प योजनेंतर्गत आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभा देण्यात येणार आहे. त्यासाठी दि.7मार्च रोजी लाभार्थी निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना छोटा व्यवसायासाठी अर्थसहाय्य, काटेरी तारकुंपनसाठी अर्थसहाय, सोलार झटका मशिनसाठी अर्थसहाय, ताडपत्रीसाठी अर्थसहाय, कोलाम लाभार्थ्यांकरीता छोटा व्यवसाय करीता अर्थसहाय्य या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड संगणकीय लॉटरी पध्दतीने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद उप येथे दि.7 मार्च रोजी दुपारी 2 वाजता करण्यात येणार आहे. वरील योजनेच्या लाभासाठई अर्ज भरलेल्या लाभार्थ्यांनी निवड प्रक्रिये करीता उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 000

यवतमाळ येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद

जिल्ह्यात उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दि.७ मार्च रोजी हॉटेल हिरा पॅलेस दारव्हा रोड यवतमाळ येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या गुंतवणूक परिषदेमध्ये राज्यशासनासोबत सामंजस्य करार होणार आहे. पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत उदघाटन होणार आहे. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे जिल्ह्यांना विकासाचा केंद्र मानून व राज्याच्या विकासाला चालना देणे तसेच गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या गुंतवणूक परिषदेचा उद्देश आहे. जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणुकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यय संधींबाबत चर्चा, सामंजंस्य करार स्वाक्षरीबाबत कार्यक्रम, उद्योजकांचे अनुभव कथन आदींचा समावेश असणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्याच्या उत्पादनाचे प्रदर्शन, निर्यातक्षम उत्पादने, भौगोलिक नामांकन असलेली उत्पादने, एक जिल्हा एक उत्पादन, विविध योजनांचे लाभार्थ्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणा

उद्या आदिवासी लाभार्थी निवड प्रक्रिया

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्यवतीने आदिवासी लाभार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनेसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्याद्वारे लाभार्थी निवड प्रक्रिया दि.६ मार्च रोजी दुपारी २ वाजता प्रकल्प कार्यालयात ठेवण्यात आली आहे. न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये ८५ टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी शेतकऱ्यांना बी-बीयाणे, खते व किटकनाशके यासाठी अर्थसहाय्य, शंभरटक्के अनुदानावर आदिम (कोलाम) जमातीच्या शेतकऱ्यांना बी-बीयाणे, खते व किटकनाशके यासाठी अर्थसहाय्य, शंभरटक्के अनुदानावर आदिम (कोलाम) जमातीच्या शेतकऱ्यांना वन्यजीवापासून शेताचे संरक्षण करण्यासाठी तार कुंपनासाठी अर्थसहाय्य, ८५ टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी लाभार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य, शंभरटक्के अनुदानावर आदिम (कोलाम) जमातीच्या लाभार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य तसेच ८५ टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी लाभार्थ्यांना शेळीगटासाठी अर्थसहाय्य करणे या योजनांचा समावेश आहे. या लाभासाठी लाभार्थ्यांची निवड प्रक

नैसर्गिक व सेंद्रीय शेती याविषयावर दोन दिवशीय प्रशिक्षण

कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या संयुक्त विद्यमाने डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नैसर्गिक, सेंद्रिय शेती या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणात शेतकऱ्यांना नैसर्गिक व सेंद्रीय शेतीवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ.मुळे यांनी आधुनिक शेतीमध्ये जास्त उत्पादन मिळविण्याकरिता शेतकरी रसायनांचा अवाजवी वापर करत आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील त्याच प्रमाणात दिसून येत आहेत. रसायनांच्या अतीवापरावर आळा घालण्यासाठी नैसर्गिक शेती शिवायपर्याय नाही, असे सांगत शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा आधार घेऊन आपल्या व आपल्या जमिनीच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. याप्रकल्पाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि सेंद्रिय निविष्टा तयार करून वापरण्

ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी सहाय्य करण्याकरीता मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातीस ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात प्रदान करणे हे या योजनेचे ध्येय व उदिष्ट आहे. या योजनेंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील. त्यात चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट व सर्वाइकल कॉलर इत्यादीचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्या

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणद्वारे कायदेविषयक शिबीर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा लोहाराच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच मुलींवरील सर्व प्रकारचा हिंसाचार दुर करण्यासाठी पावले उचलणे’ या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव कुणाल नहार हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुणाल नहार यांनी समाजात वावरत असतांना चांगल्या गोष्टी आत्मसात करावे, वाईट गोष्ट सोडून द्यावे, असे सांगितले, बाल लैगिंक अत्याचार कायदा २०१२ या विषयावर त्यांनी प्रकाश टाकला तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मिना तर प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा समुपदेशक माधुरी कोटेवार, पॅनल वकील निलिमा जोशी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या निलिमा जोशी यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, २०१२ याविषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थित मुलींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श कसा ओळखावा या

खेळाडू सवलत गुणाचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

खेळाडू, क्रीडा स्पर्धक यांना माध्यमिक १० वी व उच्च माध्यमिक १२ वी प्रमाणपत्र परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मिळणाऱ्या सवलत गुणाकरीता आवश्यक कागदपत्रांसह शाळा, महाविद्यालयांनी दि.३० मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सवलत गुणांसाठी प्रती विद्यार्थी २५ रुपये तपासनी शुल्क जमा करावयाचे आहे. तपासणी शुल्क जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सवलत गुणांचा प्रस्ताव शिफारस करतेवेळी अमरावती विभागीय शिक्षण मंडळ यांच्या नावे चलनाद्वारे किंवा रोखीने भरावयाचे आहे. शालेय स्पर्धेकरीता गुणांच्या सवलतीकरीता प्रस्ताव सादर करतांना प्राचार्य, मुख्यध्यापकाच्या पत्रासह परिशिष्ट-ई सोबत जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तरचे स्वतंत्रपणे प्रस्ताव जोडावे. विविध नमुन्यातील अर्ज १९ अंकी परिपूर्ण भरलेला असावा. खेळाडूचे प्रमाणपत्र व हॉल तिकीट, खेळाडू इयत्ता १२ वीत असल्यास १० वीचे बोर्ड सर्टीफिकेट, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रांसह प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावे. प्रत्येक पेजवर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. एकविध खेळ संघटनेच्या स्पर्धेकरीता प्राचार्य, मुख्यध्यापक यांचे पत्र, परिशिष्ट १० सोबत

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळच्यावतीने सात दिवशीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिर तालुक्यातील चिचबर्डी येथे पार पडले. शिबिरात विद्यार्थ्यांना विविध विषयांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.वि.पी.माने व उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एन.डी.पार्लावर तसेच सरपंच नंदकिशोर कुमरे, पोलिस पाटील विजेंद्र टेकाम, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता चानेकर, महाविद्यालयाच्या रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.जयश्री उघाडे उपस्थित होत्या. शिबिरामध्ये महिला बालसंगोपन, मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. उद्योजकता मार्गदर्शन, कौशल्य विकास, अन्न प्रक्रिया आधारित शासकीय योजना, अन्नप्रक्रिया रोजगार योजना, मूल्यवर्धित विविध पदार्थ निर्मिती, अन्न व औषध प्रशासन विभागातील रोजगाराची संधी, नवउद्योजक निर्मिती व इतर विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्वच्छता, योगा

महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती नोंदणी वाढविण्याचे आवाहन

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी नोंदणी वाढवावी. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी मंजूर करावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. अनुसूचित जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रदाने, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षातील या योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 7 हजार 656 अर्जाची नोंदणी केली आहे, त्यापैकी महाविद्यालयांनी केवळ 3 हजार 598 अर्ज मंजुर केले आहे. महाविद्यालयस्तरावर 3 हजार 258 अर्ज प्रलंबित आहे. जे महाविद्यालय अनुसूचित जाती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सभेस अलोट जनसागर

यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण व लाभ वितरण कार्यक्रमासाठी आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला अभूतपूर्व जनसागर लोटला होता. या सभेला जिल्हाभरातील बचत गटाच्या महिलांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधणारी होती. यवतमाळ शहराजवळील डोरली येथे आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या सभेला जिल्ह्यातील अंदाजित तीन लाखहून अधिक महिला, शेतकरी, युवकांची उपस्थिती लक्षणीय ठरली. या कार्यक्रमात वर्धा - कळंब रेल्वे मार्ग या टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ, न्यू आष्टी-अंमळनेर रेल्वे, अंमळनेर- न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभ, पीएम किसान सन्मान निधीच्या १६ व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरण, नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण, यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण, आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्डचे वितरण, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला बचत गटांना फिरत्या निधीचे वितरण, प

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वर्धा ते कळंब रेल्वेगाडीचा शुभारंभ

वर्धा-यवतमाळ- नांदेड या रेल्वे मार्गावरील वर्धा ते कळंब या रेल्वे गाडाची शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी वर्धा ते कळंब दरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेनला प्रधानमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून डिजिटली उद्घाटन केले. शुभारंभाप्रसंगी कळंब रेल्वे स्थानकावर खा.रामदास तडस उपस्थित होते. वर्धा –यवतमाळ- नांदेड असा नवीन रेल्वे मार्ग झाला असून आज दि. 28 फेब्रुवारी रोजी या मार्गावरील वर्धा ते कळंब या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्याहस्ते झाले. लोकार्पणाप्रसंगीच वर्धा ते कळंब रेल्वेगाडी देखील सुरु करण्यात आली. शुभारंभाप्रसंगी कळंब रेल्वे स्थानकावर खासदार रामदास तडस, रेल्वे अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. शुभारंभानंतर दि. 29 फेब्रुवारीपासून वर्धा ते कळंब ट्रेन क्रमांक 51119 आणि कळंब ते वर्धा ट्रेन क्रमांक 511120 च्या नियमित सेवा सुरू होणार आहेत. या गाड्या रविवार आणि बुधवार वगळता आठवड्यातून पाच दिवस चालतील, याशिवाय या गाड्या देवळी आणि भिडी स्थानकावर नियोजित थांबे असतील आणि मार्गावरील प्रवाशांच्या गरजा पूर्ण करतील. थांबे हे धोरणात्मक स्थान विविध

जात पडताळणी समितीच्यावतीने त्रुटी शिबिराचे आयोजन

आद्य क्रांतीविर राजे उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियान अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिम दिनांक 26 फेब्रवारी ते 11 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने त्रुती पुर्तता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानांतर्गत दि.1 मार्च, दि.7 मार्च व दि.12 मार्च रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॅा.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस दक्षता भवनामागे, दारव्हा रोड, यवतमाळ येथे त्रृती पुर्तता शिबीर घेण्यात येणार आहे. या कालावधीत 12 ते 5 वाजतापर्यंत ज्या अर्जदारांना समितीकडून त्रुटी पुर्ततेबाबत पत्राने, एसएमएस व ई-मेलद्वारे कळविण्यात आल आहे, त्या सर्व अर्जदरांनी उपरोक्त कालावधीत सर्व मुळ कागदपत्रासह समिती कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सदर त्रुटी पुर्ततेकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने विशेष सुनावनी कक्षाची निर्मीती देखील करण्यात आली आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त अर्जदरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे समितीचे अध्यक्ष तथा निवडश्रेणी अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्

अनाथ बालकांसाठी ५ मार्चपर्यंत ‘अनाथ पंधरवाडा’

यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनाथ बालकांसाठी ५ मार्चपर्यंत अनाथ पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्षामध्ये समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेता यावा व अनाथ प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत केली जाणार आहे. एक टक्के आरक्षणाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने महिला व बाल विकास विभागामार्फत संस्थात्मक व संस्थाबाह्य प्रवर्गातून अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे. यासाठी अर्जदाराच्या आई व वडील यांचा मृत्यूचा दाखला, अर्जदाराचा जन्म दाखला, सरपंच, पोलीस पाटील, सरपंच यांचा बालकाचे अनाथ प्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी दाखला, ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला व जात प्रमाणपत्र इत्यादीची आवश्यकता आहे. तसेच शासनाच्या इतर योजनांसाठी राशन कार्ड, जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड, राज्य वय व अधिवास दाखला आदी कागदपत्रे या अनाथ पंधरवाड्यात मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून कार्

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी शिबिराचे आयोजन

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी, समिती कार्यालयात आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियानांतर्गत दि. १ मार्च ,७ मार्च व १२ मार्च रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस दक्षता भवनामागे दारव्हा रोड, यवतमाळ येथे शिबिराचे आयोजन केलेले आहे. या कालावधीत १२ ते ५ वाजेपर्यंत ज्या अर्जदारांना समितीकडून त्रुटी पुर्तेतेबाबत पत्राने, एसएमएस व ई- मेल व्दारे कळविले आहे. त्या सर्व अर्जदारांनी उपरोक्त कालावधीत सर्व मुळ कागदपत्रासह समिती कार्यालयात उपस्थित रहावे. या त्रुटी पुर्ततेसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ यांनी विशेष सुनावणी कक्षाची निर्माती केलेली आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे समितीचे अध्यक्ष अति. जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपायुक्त तथा सदस्य प्राजक्ता इंगळे, व संशोधन अधिकारी मंगला मुन यांनी केले आहे. 000

प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पुर्ण

Image
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि.28 फेब्रुवारी रोजी येथे आयोजित कार्यक्रमाची तयारी पुर्ण झाली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व पालकमंत्री संजय राठोड यांनी कार्यक्रमस्थळाला भेट देऊन पाहणी केली व तेथेच तयारीचा आढावा घेतला. यावेळी आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.निलय नाईक, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॅा.निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्रिमहोदयांनी स्टेज, मंडप, बैठक व्यवस्था, सुरक्षा, स्क्रीन, साऊंड आदींची पाहणी केली. त्यानंतर येथेच सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेतला. जी कामे शिल्लक असतील ती आज सायंकाळपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मंडपात उभारण्यात आलेल्या कक्षांमध्ये पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी, महिलांकरीता फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. प्रत्येक गावातून बसमध्ये कार्यक्रमस्थळी येणाऱ्या महिलांसाठी बसमध्येच खाद्य पदा

भुईमूगावरील तंबाखूचे पान खाणाऱ्या अळी किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

सद्यस्थितीत भुईमूग पीकावर काही ठिकाणी तंबाखूचे पान खाणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येत असून या किडींचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या किडीची मादी पतंग पानाच्या पृष्ठभागावर पुंजक्याने अंडी घालते व त्या अंडीतून निघालेल्या अळ्या सामुहिकपणे पानाचा हिरवा भाग कुरतडून खातात त्यामुळे अशी पाने जाळीदार होतात. अति जास्त प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या अळ्या झाडाच्या पानांना फक्त शिराच शिल्लक ठेवतात. त्यामुळे या किडीच्या व्यवस्थापनासाठी अंडी पुंज व जाळीदार पाने तोडून नष्ट करावीत, प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, किडीच्या सर्वेक्षाना करिता एकरी २ ते ३ कामगंध सापळे लावावेत. या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी पिक फुलावर येण्यापूर्वी ३ ते ४ लहान अळ्या प्रती मीटर ओळीत आढळल्यास पुढीलपैकी कोणत्याही एका केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करावी. कीटकनाशकामध्ये फ्लुबेन्डायमाईड २० % डब्लुजी ६ ग्राम प्रती १० लिटर पाणी, मेथॅाक्सीफेनाझाईड २१.८ % एससी मात्रा १७.५ मिली प्रती १० लिटर पाणी, फ्लुबेन्डायमाईड ३.५० %

वसतिगृह, निवासी शाळेतील वि‌द्यार्थ्यांना साखरयुक्त फ्लेवर्ड दुध पुरवठादारांकडून दरपत्रक आमंत्रित

सामाजिक न्याय विभागांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहे व निवासी शाळेतील प्रवेशित वि‌द्यार्थ्यांना साखरयुक्त फ्लेवर्ड दुध बॉटलद्वारे पुरवठा करण्यासाठी संबंधित शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा येथे दि. २ मार्चपर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरपत्रके सादर करतांना सोबत जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, जीएसटीआर-९/३बी प्रमाणपत्र, पॅन नंबर, अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ प्रमाणपत्र, व्यवसाय कर प्रमाणपत्र, तीन वर्षाचे आयकर प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, मागील तीन वर्षाचे ताळेबंद, शॉप अॅक्ट नोंदणी प्रमाणपत्र, जीएसटी क्लिअरन्स प्रमाणपत्र असावे. प्रमाणपत्र व दरपत्रके हे दोन बंद लिफाफ्यावर शासकीय वसतिगृह, निवासी शाळेचे नाव नमूद करुन सादर करावे तसेच बंद लिफाफ्यामध्ये एक तांत्रिक बाबीचा लिफाफा व दुसरा दरपत्रकाचा, दराचा लिफाफा असणे आवश्यक आहे. ०००

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत १५० जणांना प्रशिक्षण ; अर्ज आमंत्रित

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील प्रशिक्षणासाठी या आर्थिक वर्षाकरिता १५० प्रशिक्षणार्थीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. विविध प्रशिक्षणासाठी मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील प्रशिक्षणार्थींनी विहित नमुन्यातील अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पळसवाड़ी कॅम्प, दारव्हा रोड यवतमाळ येथे करावे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी हा मातंग समाजाचा व तत्सम बारा पोट जातीतील असावा. तो महाराष्ट्रातील रहिवासी असून वय १८ ते ५० असावे. प्रशिक्षणार्थीने या पूर्वी शासनाच्या महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसून वार्षिक उत्पन्न ३ लाखापेक्षा नसावे, तसेच आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा. दिव्यांग प्रशिक्षणार्थीना ५ टक्के आरक्षणानुसार प्राधान्य देण्यात येईल. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, राशनकार्ड, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार लिंक पासबुक प्रत,

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. ४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. 000

ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक प्रबोधन शिबीर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण़ व ज्येष्ठ नागरीक मंडळ, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता "जेष्ठ नागरिक कायदा आणि योजना " या विषयावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश व. स्तर, यवतमाळचे सचिव के.ए. नहार, प्रमुख वक्ते म्हणुन पॅनल वकील अजय चमेडिया हे होते. तर मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी अध्यक्ष कृष्णराव माकोडे, माजी अध्यक्ष बळवंत चिंतावार हे उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णराव माकोडे यांनी तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन अजय चमेडिया यांनी आई वडील व ज्येष्ठ नागरीक यांचे चरीतार्थ व कल्याणासाठी करण्यात आलेला कायदा २००७ याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली, ज्येष्ठ नागरीकांसाठी असलेल्या विविध योजनेबाबत तसेच त्यांना त्यांचे मुलांकडुन खावटी तसेच मालमत्तेतुन बडतर्फे केले असल्यास या कायद्याव्दारे त्यांना कशी मिळविता येते याबाबत विस्तृत अशी माहिती दिली. ज्येष्ठांनी आपल्या मुलांबरोबर चालतांना वेळेसोबत चला कारण समाज बदलत असतांना

ड्रोन प्रक्षेपण व ड्रोनचा वापर करण्यास बंदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यवतमाळ शहरानजीक भारी येथील मैदानात दि.28 फेब्रुवारी रोजी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन प्रक्षेपण व ड्रोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री हेलिकॅाप्टरने येणार असून नागपूर-तुळजापुर महामार्गाने कार्यक्रमस्थळी जाणार आहे. त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांची व कार्यक्रमाच्या सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन प्रक्षेपण व ड्रोन वापरावर बंदी घातली आहे. सदर बंदी दिनांक 24 फेब्रुवारीपासून दि.28 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजतापर्यंत राहणार आहे. बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 कारवाई केली जातील, असे बंदी आदेशात नमूद करण्यात आले आहे. 000

सेवा सोसायटींकडून काम वाटपासाठी प्रस्ताव आमंत्रित

काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मारेगाव व शासकिय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, पांढरकवडा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था वणी येथे सफाईगार कामाकरीता सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटप करण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. त्यासाठी नोंदणीकृत सेवा सोसायटीकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ३ लक्ष इतक्या रकमेची कामे विना निविदा उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने सदर प्रस्ताव प्राप्त झाले आहे. या कामाकरीता या संस्थेने ठरवून दिलेल्या वेळेत या प्रमाणे सफाईगार या पदाकरीता कंत्राटी तत्वावर काम वाटप करावयाचे आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायटींनी या कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र अद्ययावत केलेले आहे. अशा संस्थांनी वरील कामाबाबत आपले प्रस्ताव २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ येथे सादर करावे. प्रस्तावासोबत संस्थेचे अ