अनाथ बालकांसाठी ५ मार्चपर्यंत ‘अनाथ पंधरवाडा’

यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनाथ बालकांसाठी ५ मार्चपर्यंत अनाथ पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्षामध्ये समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेता यावा व अनाथ प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत केली जाणार आहे. एक टक्के आरक्षणाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने महिला व बाल विकास विभागामार्फत संस्थात्मक व संस्थाबाह्य प्रवर्गातून अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे. यासाठी अर्जदाराच्या आई व वडील यांचा मृत्यूचा दाखला, अर्जदाराचा जन्म दाखला, सरपंच, पोलीस पाटील, सरपंच यांचा बालकाचे अनाथ प्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी दाखला, ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला व जात प्रमाणपत्र इत्यादीची आवश्यकता आहे. तसेच शासनाच्या इतर योजनांसाठी राशन कार्ड, जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड, राज्य वय व अधिवास दाखला आदी कागदपत्रे या अनाथ पंधरवाड्यात मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून कार्यवाही होणार आहे, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी कळविले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी