प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमानिमित्त २८ फेब्रुवारी रोजी वाहतूक मार्गात बदल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि.२८ फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास होणारी गर्दी लक्षात घेता यादिवशी सकाळी ८ ते रात्री १० वाजता दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास दोन ते तीन लाख महिला व कार्यकर्ते येणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने भारी विमानतळ ते कार्यक्रमस्थळ या मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नागपुर-तुळजापुर महामार्गावरील कळंब ते यवतमाळ मार्ग बंद केल्यानंतर वाहतूक खालील मार्गाने वळविण्यात येणार आहे. नागपूर - तुळजापुर महामार्गाने नागपुरकडून नांदेडकडे जाणारी व येणारी वाहतुक कळंब - बाभुळगावp मार्गे धामणगाव चौफुली यवतमाळ- पिंपळगाव लोहारा टी पॉईट भोयर बायपास- वाघाडी- वनवासी मारोती मार्गे आर्णी रोडने नांदेडकडे वळविण्यात येणार आहे. नागपुर-तुळजापुर महामार्गाने नागपुरकडून घाटंजीकडे जाणारी व येणारी जड वाहतुक कळंब- राळेगाव डोंगरखर्डा - मेटीखेडा मार्गे वळविण्यात येणार आहे, तसेच नागपुरकडून घाटंजीकडे जाणारी लहान वाहने ही कळंब जोडमोहा मार्गे वळविण्यात येणार आहे. नागपुर - तुळजापुर महामार्गाने नागपुरकडून पांढरकवडाकडे जाणारी वाहतुक कळंब राळेगाव वडकी मार्गे वळविण्यात येणार आहे. नागपुर - तुळजापुर महामार्गाने नागपुरकडून अमरावती व नेरकडे जाणारी व येणारी वाहतुक कळंब- बाभुळगाव मार्गे वळविण्यात येणार आहे. नागपुर - तुळजापुर महामार्गाने नागपुरकडून दारव्हाकडे जाणारी व येणारी वाहतुक कळंब बाभुळगाव मार्गे धामणगाव चौफुली यवतमाळ- पिंपळगाव लोहारा टी पॉईट मार्गे वळविण्यात येणार आहे. पांढरकवडाकडून नागपूर, अमरावती, दारव्हा व आर्णीकडे जाणारी व येणारी वाहतुक पांढरकवडा बायपास वनवासी मारोती भोयर बायपास लोहारा टी पॉईट पिंपळगाव धामणगाव चौफुली मार्गे वळविण्यात येणार आहे मडकोना येथून यवतमाळकडे येणारी जाणारी वाहतुक मडकोना बोरगाव मादनी सुकळी करळगाव घाट मार्गे वळविण्यात येणार आहे. नागरिकांनी दि.२८ फेब्रुवारी रोजी वळविलेल्या मार्गांचा वापर करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी