ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक प्रबोधन शिबीर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण़ व ज्येष्ठ नागरीक मंडळ, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता "जेष्ठ नागरिक कायदा आणि योजना " या विषयावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश व. स्तर, यवतमाळचे सचिव के.ए. नहार, प्रमुख वक्ते म्हणुन पॅनल वकील अजय चमेडिया हे होते. तर मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी अध्यक्ष कृष्णराव माकोडे, माजी अध्यक्ष बळवंत चिंतावार हे उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णराव माकोडे यांनी तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन अजय चमेडिया यांनी आई वडील व ज्येष्ठ नागरीक यांचे चरीतार्थ व कल्याणासाठी करण्यात आलेला कायदा २००७ याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली, ज्येष्ठ नागरीकांसाठी असलेल्या विविध योजनेबाबत तसेच त्यांना त्यांचे मुलांकडुन खावटी तसेच मालमत्तेतुन बडतर्फे केले असल्यास या कायद्याव्दारे त्यांना कशी मिळविता येते याबाबत विस्तृत अशी माहिती दिली. ज्येष्ठांनी आपल्या मुलांबरोबर चालतांना वेळेसोबत चला कारण समाज बदलत असतांना जुन्या विचारांना चालणा देवू नका. तसेच ज्येष्ठ नागरीकांना असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या योजनेबाबत सुध्दा विस्तृत अशी माहिती दिली. के.ए. नहार यांनी ज्येष्ठ नागरीकांना असलेल्या अधिकाराबाबत सुलभ अशा भाषेमध्ये त्यांना सांगितले. वृध्दाश्रमात आई-वडीलांना पाठविणे चुकीचे असुन ते आपल्या मुलांना लहानापासुन ते मोठे होईपर्यंत स्वतः काबाळ कष्ट करून मुलांना घडवितात, मुलांना घडविण्यात आई-वडीलांचा मोलाचा वाटा असतो असे यावेळी सांगितले, अशाच समाजातील शेवटच्या व तळागळातील घटकापर्यंत मोफत व सक्षम विधी सेवा पुरविली जावी हा सर्वोच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरणाचा उद्देश असल्यामुळे आजच्या कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लिपीक भुषण शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन सहसचिव राम चव्हाण यांनी केले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी