कृषी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 01 : शेतकऱ्यांना विविध कृषी योजना व उपक्रमांची माहिती व्हावी, संशोधित कृषी तंत्रज्ञान, शेतकऱ्यांचे स्वताचे अनुभव, बाजारपेठबाबतची माहिती इत्यादीबाबत शेतकऱ्यांना माहिती होण्याच्यादृष्टीने कृषी महोत्सवाचे समता मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनीमध्ये पाच दालने तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये शासकीय दालन, कृषी संलग्न कंपन्यांचे दालन, धान्य महोत्सवाचे दालन, परिसंवाद व चर्चासत्र दालन, सेंद्रीय शेतमाल विक्री दालन यांचा समावेश आहे. सदर प्रदर्शनामध्ये 186 स्टॉलची उभारणी करण्यात आली असून त्यामध्ये बचत गटांना विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतीमध्ये सिंचनाचा प्रभावीपणे वापर व्हावा या उद्देशाने संरक्षित सिंचन या बाबीखाली ठिंबक, तुषार संचाची माहिती देण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भावाबाबत तसेच पिकावर किटकनाशकांची फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, रोपवाटिका व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा करता यावा या उद्देशाने विविध कृषी संलग्न विभाग जसे रेशिम, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, ...
Comments
Post a Comment