लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्यावतीने अर्ज आमंत्रित

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या लाभासाठी ईच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. महामंडळाच्यावतीने मांग, मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील द्रारिद्रयरेषेखालील महिला, पुरुष घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाअधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने योजना राबविण्यात येतात. महामंडळामार्फत २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता एनएसएफडीसी योजनेंतर्गत सुविधा कर्ज योजना रुपये ५ लाख, लघुऋण वित्त योजना रुपये १ लाख ४० हजार, महिला समृध्दी योजना रुपये १ लाख ४० हजार तसेच शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते. या योजनांचे कर्ज प्रस्ताव https://beta.slasdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहे. जिल्ह्यातील मातंग, मादगी, मांग-गारोडी व तत्सम १२ पोट जातीतील गरजू शहरी, ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा. परितक्ता, विधुर, अंपग, निराधार असलेल्या व्यक्तीस विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची एक प्रत व ऑनलाईन अपलोड केलेले संपूर्ण कागदपत्र जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पळसवाडी कॅम्प, दारव्हा रोड, यवतमाळ येथे सादर करावी, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे. अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, राशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड, वयाचा पुरावा, व्यवसायाचे कोटेशन, व्यवसाय ज्या ठिकाणी करणार त्या जागेचा पुरावा, सीएचा प्रकल्प अहवाल, व्यवसायाचे ज्ञान असलेले अनुभव प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक व गुमास्ता लायसन्स इत्यादी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी