पत्रकारिता पुरस्काराच्या प्रवेशिका पाठविण्यासाठी मुदतवाढ

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत विविध प्रकारचे विभाग व राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी प्रवेशिका सादर करण्याकरीता दि.29 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाजमाध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेले लेखन, छायाचित्रे, वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 असा होता. तथापि, पत्रकारांच्या प्रोत्साहनासाठी प्रवेशिका स्विकारण्यासाठी दिनांक 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या स्पर्धेत जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी ईच्छूक पत्रकारांना प्रवेशिका जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध होईल. तसेच अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in व www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी