स्पर्श कुष्ठरोग अभियानांतर्गत पथनाट्याद्वारे जनजागृती

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दि. 3 फेब्रुवारी रोजी शहरातील पिंपळगाव व वैद्यकिय महाविद्यालय येथे कुष्ठरोग आजाराबाबत पथनाट्य सादरीकरणाद्वारे जनजागृती करण्यात आली. हा अ‍भियान जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार पत्की, सहसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, सहाय्यक संचालक श्री.आडकेकर, सहाय्यक संचालक डॉ. गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) यवतमाळ व सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमानाने कुष्ठरोग आजाराबाबत पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्यामध्ये सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुष्ठरोग आजाराबाबत समज, गैरसमज व औषधोपचाराविषयी समाजामध्ये जनजागृती करण्यात आली. या अभियानांतर्गत 13 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व शहरामध्ये पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. या पथनाटय सहाय्यक संचालक डॉ. गोपाळ पाटील, सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. कमल राठोड व अधिकाऱ्यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील शुभम डोंगरे, रविका चव्हाण, साईनाथ क्षेगर, गायत्री जुमणाके, श्रीकात कुंटलवार, स्वराज मोडक, गौरव गेडेकर, भारती पारशीवे, चंचल बन्सोड, शितल रामटेके, पवन आडे या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी