नियोजित बालविवाह थांबवण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश

कळंब तालुक्यातील पिढा येथील एका बालिकेचा नियोजित असलेला विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होणार असल्याची गोपनिय माहिती चाईल्ड हेल्पलाईनच्या टोल फ्री क्रमांक 1098 ला मिळाली होती. या माहितीवरून बाल संरक्षण कक्षास विवाह थांबविण्यात यश आले. गोपनिय माहितीवरून जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी, चाईल्ड हेल्पलाईन व कळंब पोलिस स्टेशनचे कर्मचारी, पोलिस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्याद्वारे बालविवाह थांबविण्यात आला. बालिकेच्या पालकांना बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 बाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर बालिकेच्या पालकांनी बालिकेच्या वयाच्या 18 वर्षानंतर तिचा विवाह करणार असल्याचे मत मांडले तसेच याबाबतचा लेखी जबाबही स्वाक्षरीने लिहून दिला. या कार्यवाहीच्यावेळी गावातील सरपंच मडावी, पोलिस पाटील जाधव, अंगणवाडी सेविका राठोड, ग्रामसेवक जाधव, पोलिस स्टेशन कळंबचे अजय शेंडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कोमल नंदपटेल, चाईल्ड हेल्पलाईनचे केस वर्कर शुभम कोंडलवार व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर व चाईल्ड हेल्पलाईन जिल्हा समन्वयक फाल्गुन पालकर यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यवाही करण्यात आली. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी