प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी महिलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध राहणार

Ø महिलांना ये-जा करण्यासाठी एसटी बसेस Ø बसमध्ये खाद्य पदार्थांची सुविधा Ø स्वच्छतागृहांसह प्रत्येक कक्षात पिण्याचे पाणी Ø औषधांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती Ø कार्यक्रमस्थळ व पार्किंगमध्ये 9 ॲम्बुलन्स प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पुर्णत्वास आली आहे. कार्यक्रमास महिलांसह तीन लाखापेक्षा जास्त उपस्थिती राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे. खाद्य पदार्थ, पाणी, वाहतूक व्यवस्थेसह विविध बाबींचा त्यात समावेश आहे. कार्यक्रमाला येण्यासाठी महिलांना गावातच एसटी महामंडळाची बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बसमध्ये प्रत्येक महिलेला प्रत्येकी दीड लिटर पाणी, विविध वस्तुंचा समावेश असलेला खाद्य पदार्थांचा बॅाक्स दिल्या जाणार आहे. प्रत्येक बसमध्ये एक समन्वयक देखील राहणार आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिलांना बसण्यासाठी सुटसुटीत व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी मंडपात 84 वेगवेगळे कक्ष उभारण्यात आले आहे. या प्रत्येक कक्षामध्ये महिलांना व्यवस्थितपणे जाता यावे यासाठी पोलिसांसह महिला कर्मचारी उपस्थित राहतील. प्रत्येक ठिकाणी थंड पाण्याचे जार व ग्लास उपलब्ध राहणार आहे. कार्यक्रम संपेपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध राहतील याची काळजी प्रशासनाच्यावतीने घेण्यात आली आहे. आरोग्यविषयक काही समस्या निर्माण झाल्यास तातडीने उपचार करता यावे, यासाठी सर्व कक्षांमध्ये प्रत्येकी एक या प्रमाणे 84 वैद्यकीय पथके तयार करण्यात आले आहे. या पथकात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आवश्यक आरोग्य कर्मचारी पुरेशा व आवश्यक औधषीसाठ्यासह उपलब्ध राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळ व वाहनतळ मिळून एकून 9 ॲम्बुलन्स उपलब्ध राहतील. महिला व तेथे येणाऱ्यांच्या सोईसाठी प्रत्येकी 10 सीटचे 100 फिरती स्वच्छतागृहे ठेवण्यात आली आहे. एकावेळी एक हजार व्यक्ती शौचालयाचा वापर करू शकतील, ईतकी या स्वच्छतागृहांची क्षमता आहे. स्वच्छतागृहे स्वच्छ रहावीत यासाठी पाण्याचे टॅंकर ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी कचरा होऊ नये यासाठी देखील काळजी घेण्यात आली आहे. प्रत्येक कक्षात त्यासाठी स्वतंत्र डस्टबीन ठेवण्यात येत आहे. कार्यक्रमस्थळी महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाच्यावतीने आवश्यक सुविधेसह दक्षता घेण्यात आली आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी