भुईमूगावरील तंबाखूचे पान खाणाऱ्या अळी किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

सद्यस्थितीत भुईमूग पीकावर काही ठिकाणी तंबाखूचे पान खाणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येत असून या किडींचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या किडीची मादी पतंग पानाच्या पृष्ठभागावर पुंजक्याने अंडी घालते व त्या अंडीतून निघालेल्या अळ्या सामुहिकपणे पानाचा हिरवा भाग कुरतडून खातात त्यामुळे अशी पाने जाळीदार होतात. अति जास्त प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या अळ्या झाडाच्या पानांना फक्त शिराच शिल्लक ठेवतात. त्यामुळे या किडीच्या व्यवस्थापनासाठी अंडी पुंज व जाळीदार पाने तोडून नष्ट करावीत, प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, किडीच्या सर्वेक्षाना करिता एकरी २ ते ३ कामगंध सापळे लावावेत. या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी पिक फुलावर येण्यापूर्वी ३ ते ४ लहान अळ्या प्रती मीटर ओळीत आढळल्यास पुढीलपैकी कोणत्याही एका केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करावी. कीटकनाशकामध्ये फ्लुबेन्डायमाईड २० % डब्लुजी ६ ग्राम प्रती १० लिटर पाणी, मेथॅाक्सीफेनाझाईड २१.८ % एससी मात्रा १७.५ मिली प्रती १० लिटर पाणी, फ्लुबेन्डायमाईड ३.५० % + हेक्साकोनाझोल ५ % डब्लुजी मात्रा ३० ग्राम प्रती १० लिटर पाणी, नोव्हॅल्युरॉन ५.२५ % + इंडोक्साकार्ब ४.५० % एससी मात्रा १७.५ मिली प्रती १० लिटर पाणी, थायामेथोक्सम १२.६० % + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५० % झेडसी मात्रा ३ मिली प्रती १० लिटर पाणी कीटकनाशक फवारणी करावी. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी