आरोग्य विभाग राबविणार जंतनाशक व पल्स पोलीओ मोहिम

मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी कारा - मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की लहान मुलांनी जंतनाशक औषधी घेतल्याने त्यांच्यातील रक्तक्षयांचा आजार कमी होऊन आरोग्यात सुधारणा होते. बालकांचा शारीरिक व मानसिक विकास होऊन अन्य संसर्गाची प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे येत्या १३ फेब्रुवारीला १ ते १९ वयोगटातील ६ लक्ष मुलामुलींना जंतनाशकाचे औषध देऊन तर ३ मार्च रोजी २.५ लक्ष ० ते ५ वयोगटातील मुलामुलींना पोलिओ संसर्ग टाळण्यासाठी पोलिओ मोहिम प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दिल्या. जिल्हास्तरीय कार्यदल समितीची आढावा सभा त्यांनी घेतली. त्यावेळी या सूचना दिल्या. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चवहाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज तगलपल्लेवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.प्रिती दुधे, सुचिता ठाकरे, चंचल मुंदाने, प्रदीप कालिकर, वैशाली काकदे व इतर समिती सदस्य उपस्थित होते. दिनांक १३ फेब्रुवारी रेाजी सर्व मुले शाळेत उपस्थित रहातील याची दक्षता घ्यावी. अनुपस्थित असणाऱ्या किंवा आजारपणामुळे किंवा अन्य कारणांमुळे हे औषध देण्यात न आल्यास २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मॉप-अप दिनी ते शाळा महाविद्यालयात व घरोघरी जाऊन द्यावे. ३ मार्च रोजी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यासाठी २३८१ बुथ व १३६ ट्रनाझेट टिम १२४ मोबाईल टिम ची व्यवस्था आरोग्य विभागामार्फत करण्यात आली. जंतामुळे होणारे त्रास व औषधाचे परिणाम व पोलिओ लसीचे महत्व पालकांना पटवुन देण्यासाठी जनजागृती करण्‍याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी