पदभरतीच्या परिक्षार्थींनी वळन मार्गांचा अवलंब करावा

राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक या गट-क संवर्गातील पदांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. दि.२८ फेब्रुवारी रोजी परिक्षेच्या दिवशी प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमानिमित्त मार्गात बदल करण्यात आला आहे. परिक्षार्थींनी बदललेल्या मार्गाची नोंद घेऊन वेळेवर परिक्षेस पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक या गट-क सवंर्गातील पदांची आयबीपीएस मार्फत सरळसेवा भरती-२०२३ घेण्यात येत आहे. सदर पदभरतीची परीक्षा जिल्ह्यामध्ये दिनांक २६, २७, २८ व २९ फेब्रुवारी रोजी एआय टेक्नॅालॅाजी ऑनलाईन परिक्षा केंद्र, द्वारा साई बीएड कॅालेज, वाघापूर बायपास, चौसाळा रोड, यवतमाळ येथे घेण्यात येत आहे. प्रधानमंत्र्यांच्या दौरा कार्यक्रमामुळे दि.28 फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते रात्री १० वाजतापर्यंत नागपुर-तुळजापुर महामार्गावरील कळंब ते यवतमाळ वाहतूक बंद करून इतर ठिकाणाहून वळविण्यात आली आहे. या दिवशी परिक्षेस येणाऱ्या परिक्षार्थींनी वळविलेल्या मार्गाचा अवलंब करून वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी