चाचा नेहरू बालमहोत्सव उत्साहात साजरा बालगृहातील विद्यार्थ्यांचा सहभाग ; विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस

महिला व बालविकास विभागाच्यावतीने आयोजित यवतमाळ चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दि.१ ते ३ फेब्रुवारी चाललेल्या या तीन दिवसीय बालमहोत्सवात जिल्ह्यातील सर्व बालगृहातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यवतमाळ श्री समर्थ प्राईड येथे आयोजित या बालमहोत्सवाची सांगता शनिवारी दि ३ फेब्रुवारी रोजी झाली.यावेळी समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बाल कल्याण समिती अध्यक्ष वासुदेव डायरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सदस्य अनिल गायकवाड, ॲड. लीना आदे, वनिता शिरफुले तसेच बाल न्याय मंडळाचे सदस्य राजू भगत, ॲड. काजल कावरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे अनिल गायकवाड यांनी सर्व बालगृहातील बालकांसाठी एक शैक्षणिक सहल लवकर आयोजित करणार असल्याचे मत व्यक्त केले. या बाल महोत्सवाचा उद्घाटन सोहळा १ फेब्रुवारीला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ. मैनाक घोष, विभागीय उप आयुक्त महिला व बालविकासाचे विलास मरसाळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष वासुदेव डायरे, बाल कल्याण समितीचे सदस्य अनिल गायकवाड,लीना आदे, वनिता शिरफुले, बाल न्याय मंडळाचे सदस्य ॲड. काजल कावरे, राजू भगत, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला होता. उद्घाटनानंतर बाल महोत्सवाला सुरवात करण्यात आली. यावेळी धावणे, गोळा फेक, थाळी फेक, कबड्डी, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, एकल गायन, सामूहिक एकल नृत्य, सामूहिक नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी मैदानी खेळ श्री समर्थ प्राईड नजिक असलेल्या मैदानामध्ये घेण्यात आले. तर शेवटच्या दिवशी ३ फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण आणि समारोप झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या बालमहोत्सवासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर, आणि जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा परिवेक्षा अधिकारी विनोद चौगुले, सहायक लेखाअधिकारी रामेश्वर काष्टे, परिविक्षा अधिकारी रवींद्र गजभिये, लेखापाल पंकज शेटे, माहिती तंत्रज्ञान तज्ञ अतुल सहारे, सामजिक कार्यकर्ता आकाश बुर्रेवार यांनी विशेष प्रयत्न केले. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी