आदिवासी शेतकऱ्यांसाठी विविध अर्थसहाय्य योजना १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत विविध अर्थसहाय्य योजनांसाठी अनुसूचित जमातीच्या शेतकऱी, लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले असून इच्छूकांनी १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्थसहाय्य योजनेचे अर्ज प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद या कार्यालयात उपलब्ध करण्यात आले आहेत. योजनेच्या लाभार्थी अर्जांचे शुक्रवार २ फेब्रुवारीपासून ते १६ फेब्रुवारीपर्यंत वाटप व स्विकृती सुरु राहणार आहे. या अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, सातबारा उतारा, आधारकार्ड, पासपोर्ट फोटोसह अर्ज स्वीकारण्याले जातील. तसेच अर्ज हे पुसद प्रकल्पातील सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह, सेतू सुविधा केंद्रावर स्वीकारले जातील. अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव व अर्ज स्वीकारले जाणार नाहीत यांची नोंद घ्यावी. योजना अंशतः बदल करणे, अथवा योजना रद्द करणे इत्यादीबाबतचे संपूर्ण अधिकार प्रकल्प अधिकारी यांनी राखून ठेवलेले आहेत. अधिक माहितीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकरी यांनी केले आहे. अर्थसहाय्याच्या योजना : आदिवासी शेतकऱ्यांना ८५ टक्के अनुदानावर काटेरी तारसाठी अर्थसहाय्य करणे, जंगला लगतच्या शेतीला तारेची जाळी बसविण्यासाठी अर्थसहाय्य करणे, तसेच ताडपत्री पुरवठा करणे, आदिवासी शेतकऱ्यांना ८५ टक्के अनुदानावर पेट्रोल स्प्रेपंप पुरवठा करणे, आदिवासी शेतकऱ्यांना कुंपनासाठी सोलर पॅनल व बॅटरीवरील झटका मशीन खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे, आदिवासी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर छोटा व्यवसायासाठी अर्थसहाय्य करणे, आदिम जमातीच्या कोलाम आदिवासी लाभार्थ्यांना व्यवसायासाठी १०० टक्के अनुदानावर अर्थसहाय्य करणे, आदिवासी पुरुष, महिला समुह, बचत गट यांना रेडीमेट होजीअरी गारमेंटसाठी अर्थसहाय्य करणे, आदिवासी महिला बचत गटास मोठ्या साधारण व्यवसायासाठी अर्थसहाय्य करणे, आदिवासी लाभार्थ्यांच्या घरांच्या विद्युतीकरण २.५ इलेक्ट्रॅानिक फिटींग करणे या योजना सुरु आहेत. ०००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी