उपजिल्हा रुग्णालय दारव्हा येथे अंडवृध्दी शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

उपजिल्हा रुग्णालय, दारव्हा येथे दि.24 फेब्रुवारी रोजी भव्य रोग निदान व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये अंडवृध्दी रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आयुष्मान भारत मोहिमेत आरोग्याशी संबंधित विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व हत्तीरोग दुरीकरणासाठी अंडवृध्दी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यापूर्वी जिल्ह्यात हत्तीरोग व अंडवृध्दी मोहीम राबविण्यात आली होती. त्यात जिल्ह्यात एकुण 280 अंडवृध्दी रुग्णांची व 593 हत्तीपाय रुग्णांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या अंडवृध्दी रुग्णांची निःशुल्क शस्त्रक्रिया होण्याच्या दृष्ट‍िकोणातून दारव्हा, आर्णी, दिग्रस व नेर या तालुक्यात असणाऱ्या अंडवृध्दी रुग्णांनी शस्त्रक्रिया करुन घेण्याकरीता उपजिल्हा रुग्णालय दारव्हा येथे नोंदणी करावी. रुग्णाची तपासणी व भरती शनिवार दि. 24 फेब्रुवारी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे तसेच शस्त्रक्रियेकरीता पात्र झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया २५ व 26 फेब्रुवारी या दिवशी करण्यात येणार आहे. या सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे परंतू ते जिल्हास्तरावर जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी विशेष तज्ञ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. अंडवृध्दी व हर्निया असणाऱ्या रुग्णांनी या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय दारव्हाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. अभय मांगे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.टी.ए. शेख व दारव्हाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के.सी. बानोत यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी