मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीसाठी शाळांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. इयत्ता 5 ते 10 वी पर्यंतच्या विविध शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शाळांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इयत्ता ९ वी व १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, सफाई कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क या सर्व योजनांची संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी करावयाची आहे. शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी https://prematric.mahait.org/Login/Login ही महाडीबीटी प्रणाली वेब लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्याध्यापकांना अर्ज नोंदणी करीता युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे. शाळांनी पात्र सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करण्यात यावेत व ऑनलाईन अर्जाची प्रत जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयात दि. २९ फेब्रुवारी पर्यंत सादर करावे. या योजनेचे पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहिल याची नोंद घ्यावी, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी पीयूष चव्हाण यांनी कळविले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी