‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यक्रमाचे ९ फेब्रुवारी रोजी आयोजन

शासन आपल्या दारी या संकल्पने अंतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्यावतीने ‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. ९ फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय भवन, यवतमाळ येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असून त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात चर्मकार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी कार्यशाळा व चर्मकार बांधवांना महामंडळाच्या योजनांची माहिती, योजनांचे माहितीपत्रके व इच्छूक उमेदवारांकडून फॉर्म भरून घेतले जाणार आहे. यासह मंजुरी पत्र व मंजूर प्रकरणांचे धनादेश वाटप करण्यात येणार आहे. एमसीईडीमार्फत महाराष्ट्रामध्ये २५ हजार युवक-युवतींना निवासी व अनिवासी प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी चर्मकार युवक युवतींची नोंदणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व युवक-युवतींनी व चर्मकार बांधवांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अल्का अस्वार यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी