बांधकाम कामगारांना योजनेच्या लाभाची रक्कम थेट बॅंक खात्यात कामगारांनो, अमिषाला बळी पडु नका ; नोंदणी व नुतनीकरण होते एक रुपयात

इमारत व इतर बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत लाभाची रक्कम डीबीटीद्वारे थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. कामगारांनी कोणत्याही अमिषाला व दबावाला बळी पडु नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या संदर्भात रोजगार व सेवा शर्ती तसेच त्यांची आरोग्य व सुरक्षा विषयात तरतुदी करण्याच्या उद्देशाने इमारत व इतर बांधकाम रोजगार व सेवा शर्ती अधिनियम, १९९६ तयार करण्यात आला आहे. या अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम २००७ तयार केला आहे. या अधिनियमाच्या कलम १८ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना १ मे २०११ रोजी करण्यात आली आहे. या मंडळाचे कामकाज कामगार विभागांतर्गत चालत आहे. यवतमाळ जिल्ह्यात सन जुलै २०२० पासून बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनेची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु असून त्यासाठी मंडळाने महाबीओसीडब्ल्यू www.mahabocw.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतनीकरण करण्यासाठी एक रुपये इतकेच शुल्क आकारले जाते व त्याची पावती दिली जाते. बांधकाम कामगारांनी नोंदणी, नुतनीकरण पावती इतर मुळ कागदपत्रे स्वत:जवळ जपून ठेवावी. सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप व आरोग्य तपासणी मोफत केली जाते. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत लाभाची रक्कम डीबीटीद्वारे थेट बांधकाम कामगाराच्या खात्यात जमा करण्यात येते. याची सर्व नोंदीत जिवितपात्र बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी. तसेच, कामगारांनी कोणत्याही अमिषाला व दबावाला बळी पडु नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या मार्फत करण्यात आले आहे. ०००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी