वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत यवतमाळ येथे 100 मुलींची क्षमता असलेले वसतिगृह कार्यरत आहे. या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज वाटप व स्विकृतीची प्रक्रिया सुरु झाली असून ईच्छूक मुलींनी त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सहाय्यक संचालक यांच्या अधिनस्त 100 मुलींची क्षमता असलेले साई सत्यजोत मंगल कार्यालय (वसतिगृह) आर्णि नाका येथे कार्यरत आहे. वसतिगृहामध्ये सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनीसाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशाचे अर्ज वाटप व स्विकारणे बाबत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, पळसवाडी कॅम्प, दारव्हा रोड, यवतमाळ येथे सुरू झालेले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च असून इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेण्याऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थींनींनी वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक मंगला मुन यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी