केंद्र शासनाच्या योजना प्रभाविपणे राबवा - आनंदराव पाटील

सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा. अधिकाधिक पात्र व गरजू लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ कसा मिळेल, अशा पद्धतीने योजनांची अंमलबजावणी करा, असे निर्देश केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्हा प्रभारी आनंदराव पाटील यांनी दिले. महसूल भवन येथे त्यांनी यात्रेचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी राजेश देवते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांच्यासह विविध विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाच्यावतीने विविध 34 प्रकारच्या फ्लॅगशिप योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा देशभर पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. परंतू अजूनही अनेक पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित आहे. अशा लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहिम राबविण्यात आली. मोहिमेंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामाचा विभागनिहाय आढावा श्री.पाटील यांनी यावेळी घेतला. शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना अनेक प्रकारच्या अडचणी असतात. अशा अडचणीत त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना आपण मदत करू शकतो, ही भावना योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे. योजनांचा लाभ लाभार्थ्यांचे जीवनमान बदलवू शकतो. त्यामुळे आपल्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांना कशा देता येईल, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे श्री.पाटील म्हणाले. विविध विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती देखील यावेळी त्यांनी घेतली. अभियानाचे जिल्हा समन्वयक अधिकारी जालिंदर आभाळे यांनी जिल्ह्यात या अभियानांतर्गत झालेल्या कामाची माहिती सादर केली. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी