राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला आरोग्य विभागामार्फत आज सुरूवात करण्यात आली. एकाच दिवशी १ ते १९ वर्षे वयोगटातील सुमारे ६ लाख ३३ हजार बालकांना जंतनाशकाच्या गोळ्या देण्यात येत आहे. या मोहिमतून १३ फेब्रुवारीला सुटलेल्या बालकांना २० फेब्रुवारी रोजी मॉपअप राऊडंमधुन गोळ्या देण्यात येणार आहे. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन नगरपरीषद शाळा क्रमांक ११ आठवडी बाजार येथे जिल्हा शल्चिकित्सक डॉ.एस.एस.राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना अलबॅन्डॉ‍झोलची गोळी खाऊ घालून करण्यात आला. यावेळी डॉ.एस.एस. राठोड यांनी आजचे विद्यार्थी हे देशाचे उज्वल भविष्य असल्याने त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्याकरीता आरोग्य‍ विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायेाजनेचा लाभ घ्यावा तसेच सर्व मुलांनी जंतनाशक गोळी खावी व आपले आरोग्य सुदृढ ठेवावे, असे आवाहन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पि.एस.चव्हाण यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, स्वच्छतेचे महत्व‍ समजावून सांगावे तसेच आपल्या समक्ष गोळी देण्याचे आव्हान केले. जिल्हा माता बाल संगोपण अधिकारी डॉ.प्रेमकुमार ठोंबरे यानी प्रास्ताविकपर भाषणात मोहिमेची विस्तृत माहिती सांगताना, मुलांना जंताचा प्रादुर्भाव झाल्यावर शरीराला व्यवस्थित पोषणतत्वे मिळत नाही. त्यामुळे मुले कुपोषित होतात. जंताचा प्रादुर्भाव होऊ नये करीता स्वच्छता व योग्य आहाराची काळजी घ्यावी, असे सांगितले. कार्यक्रमास आरएमओ डॉ.तगडपल्लेवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधूकर मडावी, वैद्यकीय अधिकारी डॉ.नावंदीकर, डॉ.संजना लाल, मुख्याध्यापक सीताराम राठोड, विस्तार अधि‍कारी प्रशांत पाटील, डॉ.निलेश लिचडे, डॉ.प्रमोद लोणारे, शुभांगी डेंगे, कल्पणा कोपरकर, पुजा पाटील, रमेश देशमुख, किरण राठो‍ड, संतोष राठोड, सुचेता ठाकरे, वंदना मोहरकर तसेच विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी