यवतमाळ आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांची दुबईस्थित आस्थापनेत निवड

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ संस्थेमध्ये दिनांक 8 व 9 फेब्रुवारी रोजी इसा सालेह अल गुर्ग, दुबई या आस्थापनेमार्फत भरती मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात संस्थेतील तब्बल 50 उमेदवारांची दुबई येथील आस्थापनेसाठी निवड करण्यात आली. या भरती मेळाव्याचे उद्घाटन अमरावती विभागाचे सहसंचालक पी.जे.घुले व सहाय्यक संचालक आर.एम.लोखंडे यांनी केले. मेळाव्याकरीता दुबई येथून तीन सदस्यीय शिष्टमंडळ आले होते. आस्थापनेच्या शिष्टमंडळाने आस्थापनेच्या कामकाजाबाबत व्हीडीओद्वारे सर्व उपस्थितांसमोर सादरीकरण केले. त्यानंतर मुलाखतीद्वारे एकूण 50 उमेदवारांची निवड करण्यात आली. आस्थापनेमार्फत एम्प्लॅायमेंट विसा, विमानाचे तिकीट तसेच इतर सुविधा पुरविल्या जाणार आहेत. प्रशिक्षणार्थ्यांचे पासपोर्ट तयार झाल्यानंतर विसाची प्रक्रीया आस्थापनेमार्फत केली जाणार आहे. याकरीता अंदाजे 1 लाख 60 हजार खर्च अपेक्षित असून हा खर्च आस्थापनेमार्फत केला जाणार आहे. या यशाकरीता संस्थेतील संपूर्ण कर्मचारी वृंद व प्राचार्य व्ही.जे.नागोरे यांनी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन केले, असे आयटीआय यवतमाळच्यावतीने कळविण्यात आले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी