सेवा सोसायटींकडून काम वाटपासाठी प्रस्ताव आमंत्रित

काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मारेगाव व शासकिय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, पांढरकवडा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था वणी येथे सफाईगार कामाकरीता सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटप करण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. त्यासाठी नोंदणीकृत सेवा सोसायटीकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ३ लक्ष इतक्या रकमेची कामे विना निवीदा उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने सदर प्रस्ताव प्राप्त झाले आहे. या कामाकरीता या संस्थेने ठरवून दिलेल्या वेळेत या प्रमाणे सफाईगार या पदाकरीता कंत्राटी तत्वावर काम वाटप करावयाचे आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायटींनी या कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र अद्ययावत केलेले आहे. अशा संस्थांनी वरील कामाबाबत आपले प्रस्ताव 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ येथे सादर करावे. प्रस्तावासोबत संस्थेचे अद्ययावत नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे सन २०२३-२४ चे ऑडिट रिपोर्ट, मागील तीन महान्यांचे बँक स्टेटमेट, संस्थेतील सर्व सदस्यांची अद्ययावत यादी व सेवायोजन नोंदणी कार्ड इत्यादी कागदपत्रे जोडावयाची आहे. आवश्यक अटी व शर्तीची पुर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरुपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केलेले आहे. 000 --

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी