आयटीआय उमेदवारांना दुबईमध्ये रोजगाराची संधी ८ व ९ फेब्रुवारीला मुलाखत

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दुबईतील इसा सालेह अल गुर्ग ही आस्थापना जिल्ह्यातील आयटीआय उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी येणार आहे. या माध्यमातून आयटीआय उमेदवारांना दुबईमध्ये रोजगाराची संधी मिळणार आहे. कंपनीचे अधिकारी मुलाखतींसाठी दि. ८ व ९ फेब्रुवारी रोजी यवतमाळात येणार आहेत. या आस्थापनेच्या भरतीसाठी इलेक्ट्रीशियन, प्लंबर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, रेफ्रीजरेशन अॅण्ड एअर कन्डीशनर टेक्नीशियन या व्यवसाय शिक्षणातील उत्तीर्ण तसेच अंतिम वर्षाला प्रशिक्षण घेणारे उमेदवार पात्र आहेत. पात्र उमेदवारांनी इंग्रजीतील कॉम्प्युटराईज्ड रिझ्यूम, दहावी, बारावीची गुणपत्रिका, टिसी, आयटीआय प्रमाणपत्र (एनटीसी), आधार कार्ड व पासपोर्ट फोटो प्रत्येकी दोन प्रतीमध्ये सोबत आणणे आवश्यक आहे. दुबईतील चलनानुसार आस्थापनेमधील वेतन दरमहा एईडी ११५० इतके राहणार आहे. आस्थापनेमार्फत विविध सुविधाही पुरविल्या जाणार आहेत. त्यामध्ये एप्लॉयमेंट व्हिसा, एअर तिकीट इन एव्हरी टु इअर्स, मेडीकल इन्सुरन्स, कॅम्प ॲकोमोडेशन, ट्रान्सोर्पोटेशन, एअर तिकीट फॉर फस्ट जॉयनिंग या सुविधांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी ए.व्ही. पिंगळे (जेएए) यांच्या भ्रमणध्वनी ९४२३४३४७०३ क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही.जे.नागोरे यांनी केले आहे. ०००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी