आदिवासी वसतीगृहासाठी ९ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा या प्रकल्पाअंतर्गत वसतीगृहासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून विद्यार्थ्यांनी ९ फेब्रुवारीपर्यंत परिपूर्ण अर्ज भरण्याचे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक याशनी नागराजन यांनी केले आहे. पांढरकवडा प्रकल्पाअंतर्गत एकूण १९ मुलामुलींचे वसतीगृहे आहेत. या वसतीगृहीसाठी स्वयंम महाॲानलाईन या संकेतस्थळावरुन अर्ज भरले जात आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे वसतीगृह अर्ज भरतांना कागदपत्र प्रलंबित राहीले असतील त्यांनी त्यांचा अर्ज पूर्ण भरावे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी संकेतस्थळ सुरू ठेवण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अपूर्ण वसतीगृह प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने दिलेल्या दिनांकानुसार पूर्ण करण्यात यावे. यानंतर, वसतीगृह प्रवेशास मुदतवाढ मिळणार नाही, याची नोंद सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जुन्या आणि नवीन व्यावसायिक व पदवी अभ्यासक्रमासाठी संकेतस्थळ सुरु ठेवण्यात येणार आहे, असे सहायक जिल्हाधिकारी याशनी नागराजन यांनी कळविले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी