जिल्ह्यातील मराठा समाज, खुल्या प्रवर्गाचे 100 टक्के सर्वेक्षण पूर्ण

जिल्ह्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात हे सर्वेक्षण 100 टक्के पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. या कालावधीत जिल्ह्यातील 1939 गावातील 6 लाख 24 हजार 884 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट होते. हा उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्यात आला आहे. जिल्ह्यात 23 जानेवारीपासून सुरु झालेल्या सर्वेक्षणासाठी 3272 प्रगणकांची नेमणूक करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रगणकांनी 1939 गावांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन घरोघरो भेटी देवून सर्वेक्षणातील माहिती घेतली होती. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी