चर्मकार महामंडळाच्यावतीने लिडकॉम आपल्या दारी कार्यशाळा

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 'लिडकॉम आपल्या दारी' या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपायुक्त प्राजक्ता इंगळे यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक अल्का अस्वार, महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाचे व्यवस्थापक रुपेश हिरुळकर, कौशल्य विकास विभागाचे राहुल गुल्हाने, महात्मा फुले विकास महामंडळाच्या व्यवस्थापक माधुरी अवधाते, लोकशाहिर अन्नाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक माया खडसे तसेच बाळासाहेब गावंडे, श्रीकृष्ण पखाले उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक बाळासाहेब गावंडे व श्रीकृष्ण पखाले यांनी चर्मकार बांधवांना समयोचित मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संचालन व मार्गदर्शन डॉ. कमलदास राठोड यांनी केले तर आभार अमर तांडेकर यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीसाठी ज्योती मालाधारी, सीमा भोयर यांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्ह्यातील चर्मकार बांधव, महामंडळ व आयुक्त कार्यालयाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी