खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या योजनांच्या जनजागृतीसाठी आज पुसदमध्ये एक दिवसीय जनजागृती मेळावा

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व त्यांचा लाभ सुशिक्षित बेरोजगार, तरुणतरुणी व लाभार्थ्यांना होण्यासाठी आज दि.७ फेब्रुवारी रोजी पुसदमधील बिरसा मुंडा चौकातील नगरपरिषद हिंदी शाळेत एक दिवसीय जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मंडळामार्फत संपूर्ण राज्यात मध केंद्र योजना कार्यान्वित झालेली आहे. या योजनेंतर्गत महिला, युवक युवती, सुशिक्षीत बेरोजगार, आदिवासी, जेष्ठ नागरीक, अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, स्वातंत्र्य सैनिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, स्वयंसहाय्यता युवा गट, शेतकरी, शेतमजूर, भूमिहिन, पारंपरिक कारागीर इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मद्य योजनेचा लाभ देण्यात येतो. याशिवाय मंडळामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना इत्यादी योजना राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत उद्योजकांना विविध उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते तसेच अनुदानाचा लाभ देण्यात येतो. मध योजनेअंतर्गत लाभ घेवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना विनाशुल्क निवासी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात येते. या योजनांची माहिती व फायदे जास्तीत जास्त लोकांना देण्यासाठी या एक दिवसीय जानजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासमध्ये कृषी, वन, पंचायत समिती इत्यादी शासकीय कार्यालयाचा सहभाग राहणार आहे. या मेळाव्यात प्रवेश निःशुल्क असून इच्छुकांची नांव नोंदणी करून त्यांचे फॉर्म भरुन घेण्यात येणार आहे. हा मेळावा सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे. या जनजागृती मेळाव्यात इच्छुकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी